Advertisement

पेट्रोलची दरवाढ सुरूच

देशात इंधनांच्या दरातील वाढ सुरूच आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल महागलं आहे.

पेट्रोलची दरवाढ सुरूच
SHARES

देशात इंधनांच्या दरातील वाढ सुरूच आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल महागलं आहे.  पेट्रोल ३५ पैशांनी महागलं आहे. तर डिझेलच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. रविवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १८ पैशांनी महागले होते.

मुंबईत पेट्रोल १०५.९३ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोलने शंभरी पार केली आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ९९.८६ रुपयांवर गेला आहे. तर डिझेलची किंमत ८९.३६ रुपये एवढी आहे. चेन्नईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर १००.७९ रुपये इतके आहेत. तसंच कोलकातामध्ये आज पेट्रोल ९९.८० प्रतिलिटर झाले आहे.  मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये डिझेलची किंमत अनुक्रमे ९६.९१ रुपये, ९३.९१ रुपये आणि ९२.२७ रुपये प्रतिलिटर इतकी आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा आयात खर्च वाढला आहे. परिणामी त्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ४ मे पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण ३३ वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३३ वेळा वाढ झाली. 

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.



हेही वाचा-

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

महापालिका 'यांच्या'साठी खरेदी करणार २४ नव्या गाड्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा