Advertisement

4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर शुल्क भरा


4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर शुल्क भरा
SHARES

मुंबई - एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या बँकांनी बुधवारपासून एका महिन्यात चार पेक्षा अधिक व्यवहारांवर प्रति 150 रुपये शुल्क आकारणी सुरू केली आहे. हे शुल्क बचत त्याचप्रमाणे वेतन खात्यालाही लागू पडणार आहे. बँकांचा हा निर्णय बेकायदेशीर आहे. खासगी बँका जे करतात कालांतराने राष्ट्रीयकृत बँका याचं अनुकरण करतात ही दुर्देवाची बाब आहे. त्यामुळे आता आम्हाला खासगी बँकांच्या या निर्णयाला विरोध करावा लागत आहे. तसंच सरकारी कर्मचारी आणि पोलीस यांचं वेतन खातं अॅक्सिस बँकेत आहेत. त्यामुळे अॅक्सिस बँकेतून पगार काढताना अशाप्रकारे कर आकारणार असेल तर कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेतून बंद करावीत आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ती उघडावीत अशी मागणी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य बॅंक कर्मचारी फेडरेशन आणि अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा