Advertisement

मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालक ४ जानेवारीपासून संपावर

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खासगी सीएनजी पंप चालकांनी ४ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे येथील टॅक्सी आणि रिक्षा सेवेवर होणार आहे.

मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालक ४ जानेवारीपासून संपावर
SHARES

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खासगी सीएनजी पंप चालकांनी ४ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे येथील टॅक्सी आणि रिक्षा सेवेवर होणार आहे. युनायटेड सीएनजी डिलर्स असोसिएशननं पत्रकार परिषद घेऊन संपाची घोषणा केली 

ठाण्यात मंगळवारी युनायटेड सीएनजी डीलर असोसिएशनची बैठक झाली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात  ४० खासगी सीएनजी पंप आहेत. मात्र, महानगर गॅस कंपनीने आणलेल्या नवीन धोरणानुसार सीएनजीच्या खासगी पंप मालकांना महानगर गॅस कंपनीसोबत १५ वर्षे भाडेकरार करावा लागणार आहे. तसंच नवीन धोरणात पंप परिसरातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्यास थेट करार रद्द करण्यासारख्या अनेक जाचक अटी आहेत.

त्यामुळे या नव्या धोरणांविरोधात खासगी सीएनजी पंप मालकांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पेट्रोल डीलर संघटनाही आमच्या मागण्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या पंपावरील सीएनजी पंप बंद ठेवणार असल्याचे युनायटेड सीएनजी डीलर असोसिएशन समितीचे सदस्य संजय कदम यांनी सांगितले.हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्करRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा