Advertisement

Pubg भारतात पुन्हा सुरू होणार

Pubg लवकरच भारतात परतणार असून केवळ भारतीयांसाठीच या गेमचं डिजाईन करण्यात आलं आहे. भारतात हा गेम PUBG Mobile India या नावाने लाँच केला जाणार आहे.

Pubg भारतात पुन्हा सुरू होणार
SHARES

भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेला Pubg पुन्हा भारतात परतणार आहे. काही महिन्यांपूर्वी भारताने चीनच्या अनेक मोबाईल अॅप्सना भारतात बंदी घातली होती. यामध्ये Pubg Mobile  Game  चा समावेश होता.

Pubg बंद झाल्यामुळे अनेक भारतीय तरुणांचा हिरमोड झाला होता. हा मोबाईल गेम भारताच सर्वाधिक खेळला जात असल्याने चीनच्या कंपनीचीही आर्थिक कोंडी झाली होती. मात्र Pubg लवकरच भारतात परतणार असून केवळ भारतीयांसाठीच या गेमचं डिजाईन करण्यात आलं आहे. भारतात हा गेम PUBG Mobile India या नावाने लाँच केला जाणार आहे.

PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरुक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार करणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

PUBG कधी लाँच होणार, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीने गेमच्या लाँचिंगबाबत लवकरच माहिती जाहीर करु असं म्हटलं आहे.



हेही वाचा -

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा