Advertisement

मुलांच्या शिक्षणासाठी उघडू शकता पीपीएफ खातं

अल्पवयीन मुलांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना चांगली फायदेशीर ठरू शकते. लहान मुलांच्या नावाने पीपीएफ खातं उघडणं हा एक खूप चांगला पर्याय आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी उघडू शकता पीपीएफ खातं
SHARES

शिक्षणाचा वाढता खर्च पाहता, पालकांना आतापासून आपल्या मुलाच्या भावी शिक्षणाच्या खर्चासाठी तरतूद सुरू करावी लागेल. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी बचत करू शकतील अशा अनेक योजना आहेत. मात्र, अल्पवयीन मुलांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना चांगली फायदेशीर ठरू शकते. लहान मुलांच्या नावाने पीपीएफ खातं उघडणं हा एक खूप चांगला पर्याय आहे.  मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या शिक्षण व इतर गरजांसाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीसाठी ती एक उत्तम दीर्घकालीन बचत योजना आहे. 

 सध्याच्या पीपीएफच्या नियमांनुसार मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकता. पीएफ खात्याचा लॉक इन पिरीयड १५ वर्षांचा असतो. मुले सज्ञान ते खाते चालवू शकतात. जेव्हा तुम्ही लहान वयात मुलाचे पीपीएफ खाते काढल्यास मुले वीस-पंचवीस वर्षाची होईपर्यंत लॉक इन पिरियडची १५ वर्षे पूर्ण होतात किंवा होत आलेली असतात. मुलांना त्यातील पैसे काढून अकाउंट बंद करता येते किंवा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेता येतो.

पालक किंवा पालकांच्या अनुपस्थितीत पीपीएफ खाते उघडले / ऑपरेट केले जाऊ शकते. केवळ एक पालक खाते उघडू शकतो. आई -वडील दोघेही एकाच अल्पवयीन मुलीच्या वतीने खाते उघडू शकत नाहीत. अल्पवयीन मुलाचे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर पालक होईपर्यंत त्याचे आजी आजोबा पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत.

खाते कुठे उघडू शकतो?

पीपीएफ खाते अधिकृत पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही नियुक्त बँक शाखेतून उघडता येते.

आवश्यक कागदपत्रे

पीपीएफ खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये अल्पवयीन मुलासह पालकांना त्यांचे तपशील द्यावे लागतील. पालकांची केवायसी कागदपत्रे, छायाचित्र, अल्पवयीन मुलाचा वयाचा दाखला (आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र) देऊन खाते उघडता येते. 

किमान आणि जास्तीत जास्त गुंतवणूक

आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये पीपीएफ खात्यात भरावे लागतात. तर  मुलाच्या पीपीएफ खात्यात कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त आता दीड लाख रुपये जमा करू शकते.  

कर

परिपक्वता रकमेसह पीपीएफ खात्यात मिळणारे व्याज करमुक्त आहे.



हेही वाचा -

ज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज

पर्सनल लोन घेताय? जाणून घ्या बँकांचे व्याजदर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा