Advertisement

आरबीआयकडून 'या' बँकांना ५० हजार कोटींचं पॅकेज

कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही ठोस पावलं उचलली आहेत.

आरबीआयकडून 'या' बँकांना  ५० हजार कोटींचं पॅकेज
SHARES

कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही ठोस पावलं उचलली आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा केल्या.

यावेळी शक्तीकांत दास यांनी आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात येत असल्याचं सांगितलं. यामध्ये शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. छोटया उद्योगांशी संबंधित असलेली बँक सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि  गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेली बँक एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

शक्तीकांत दास यांनी यावेळी रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. आता रिव्हर्स रेपो रेट ३.७५ टक्के असेल. 30 जूनपर्यंत बँकांना एनपीए घोषित करावा लागणार नाही असं सांगून बँकांना त्यांनी आवाहन केलं की, जास्तीत जास्त ग्राहकांना बँकांकडून ईएमआयमध्ये सूट देण्यात यावी.

शक्तीकांत दास म्हणाले की, कोरोनाच्या प्रत्येक घडामोडींबाबत आरबीआय सतर्क आहे. जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. 2020 हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मंदीचे वर्ष आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी १.९ टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. आयएमएफनुसार कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर ७.२ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो. सध्या मानवतेसमोर कोरोनाचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान

Coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा