Advertisement

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ९८ टक्के खातेदार हे ठेवीदार विमा सुरक्षेत आहेत. त्यामुळे या खातेदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई
SHARES

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा (shivajirao bhosale sahakari bank ) परवाना ( licence) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (reserve bank of india) रद्द केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने (rbi) दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने २८ मे रोजी तत्काळ आदेश काढत बँकेचा परवाना रद्द केला. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने बँकेवर कारवाई केली आहे. 

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील (shivajirao bhosale sahakari bank) ९८ टक्के खातेदार हे ठेवीदार विमा सुरक्षेत आहेत. त्यामुळे या खातेदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळेल, असं आरबीआयने म्हटलं आहे. ठेवीदार विमा आणि पत हमी महामंडळ कायदा १९६१ नुसार बँक बंद करण्याची आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे

बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला असला तरी बँकेतील ९८ टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. ठेवीदारांना ओळखपत्रांसह (केवायसी प्रक्रियेनुसार आवश्यक) आपला दावा सादर करावा लागणार आहे. 

बँकेची आर्थिक स्थिती खालावत चालली होती. त्यामुळे विद्यमान खातेदारांना देखील बँकेकडून पूर्ण पैसे परत मिळाले नसते. खातेदारांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्याचे म्हटलं आहे. ४ मे २०१९ पासून शिवाजीराव भोसले बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. तेव्हापासून रिझर्व्ह बँकेकडून शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिकस्थितीचा आढावा घेण्यात येत होता.हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा