एटीएममधून मिळणार दिवसाला 10 हजार रुपये


SHARE

मुंबई - दिवसाला 4500 ऐवजी आता 10,000 हजार रुपये एटीएमधून काढता येणार आहेत. आरबीआयने सोमवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. मात्र आठवड्याला 24 हजार रुपयेच काढता येणार असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले. त्यासोबतच चालू खात्यातून आठवड्याला 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्यास आरबीआयने मंजूरी दिली आहे.1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला होता. त्यातच पैसे काढण्यावर देखील मर्यादा असल्याने एटीएम बाहेरची गर्दी कमी होत नव्हती. अखेर आरबीआयने सोमवारी महत्वपूर्ण निर्णय घेत नवीन वर्षात सर्वसामान्यांना खुशखबर दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या