Advertisement

कराड जनता बँक दिवाळखोरीत, आरबीआयकडून परवाना रद्द

रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेवर २०१७ मध्ये निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरीत गेल्याची अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली आहे.

कराड जनता बँक दिवाळखोरीत, आरबीआयकडून परवाना रद्द
SHARES

सातारा जिल्ह्यातील नावाजलेली कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत गेली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे बँकेतील हजारो ठेवीदार अडचणीत आले आहेत. 

रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेवर २०१७ मध्ये  निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरीत गेल्याची अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली आहे. बँकेच्या संचालकांवर ३१० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले होतेे. यानंतर या बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली. 

कराड जनता बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राज्यात इतर ठिकाणी एकूण २९ शाखा आहेत. या बँकेचे ३२ हजार सभासद आहेत. दरम्यान, मागील महिन्यात आरबीआयने जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. १७ नोव्हेंबरपासून पुढच्या सहा महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 



हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा