Advertisement

पोस्टात महाराष्ट्र सर्कलमध्ये भरणार २४२८ जागा

पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये २४२८ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठीची भरती प्रक्रिया पोस्टाने सुरू केली आहे.

पोस्टात महाराष्ट्र सर्कलमध्ये भरणार २४२८ जागा
SHARES

पोस्टाच्या महाराष्ट्र  सर्कलमध्ये २४२८ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठीची भरती प्रक्रिया पोस्टाने सुरू केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीत शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक पदांच्या  रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२१  आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) १० वी उत्तीर्ण २) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

जाहिरात  https://drive.google.com/file/d/1AthlHF8Hqya-iHt0VnkRjwt2KBPWUoYt/view

ऑनलाईन अर्ज - https://appost.in/gdsonline/

अधिक माहितीसाठी

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कलच्या अधिकृत वेबसाइट https://maharashtrapost.gov.in/वरून माहिती मिळवू शकता.

 


हेही वाचा -

महिलांसाठी एनटीपीसीमध्ये खास भरती, 'इतक्या' जागा भरणार

एसबीआयमध्ये ५१२१ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा