Advertisement

रिलायन्स रिटेलने घेतला जस्ट डायलमधील ४०.९५ टक्के हिस्सा

या व्यवहारामुळे जस्ट डायलचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. तर जस्ट डायलला आपली उत्पादने आणि सेवांचा विस्तारही करता येणार आहे.

रिलायन्स रिटेलने घेतला जस्ट डायलमधील ४०.९५ टक्के हिस्सा
SHARES

रिलायन्स उद्योग समूहातील रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने जस्ट डायल लिमिटेडमधील ४०.९५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याशिवाय कंपनीने २६ टक्के खुल्या गुंतवणुकीची ऑफरही दिली आहे. त्यामुळे रिलायन्स रिटेलची जस्ट डायलमधील एकंदर भागीदारी ६६.९५ टक्के होणार आहे.

रिलायन्स रिटेलने जस्ट डायलमधील हिस्सेदारी ३ हजार ४९७ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या व्यवहारामुळे जस्ट डायलचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.  तर जस्ट डायलला आपली उत्पादने आणि सेवांचा विस्तारही करता येणार आहे. तसंच जस्ट डायलचा डेटाबेस आणखी मजबूतही होणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत जस्ट डायलचा डेटाबेस ३०.४ मिलियन लिस्टिंग होता. गेल्या तिमाहीत १२९.१ अब्ज युनिक युजर्सनी जस्ट डायल प्लॅटफॉर्मचा वापर केला होता.

 रिलायन्स रिटेलची जस्ट डायलमधील ही भागीदारी व्यापारी, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यास प्रोत्साहन देईल, असे या गुंतवणुकीबाबत बोलताना रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी सांगितले.

रिलायन्स रिटेलने भागीदारी विकत घेतली असली तरी सध्याचे व्ही. एस. एस. मणी हेच जस्ट डायलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा