कर्जाचा हप्ता महागणार; अारबीअायची रेपो दरात वाढ

बुधवारी अार्थिक अाढावा पतधोरणात अारबीअायचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी रेपो दरात ०.२५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे अाता रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.५० टक्के झाला अाहे. रेपो दर वाढवल्याने अारबीअायकडून बँकांना मिळणारं कर्जावरील व्याजदरात वाढ होऊन बँकांना हे कर्ज महाग होणार अाहे.

SHARE

कर्ज     कर्ज     रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ केली अाहे. त्यामुळे बँकांचं सर्व प्रकारचं कर्ज महागणार असून कर्जधारकांचा ईएमअायही वाढणार अाहे. आरबीआयने रिव्हर्स रेपो दरही पाव टक्क्याने वाढवला अाहे.  रिव्हर्स रेपो अाता ६.२५ टक्के झाला अाहे. महागाई वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अारबीअायने रेपो दर वाढवला अाहे. 


गृह, वाहन कर्ज महागणार

बुधवारी अार्थिक अाढावा पतधोरणात अारबीअायचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी रेपो दरात  ०.२५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे अाता रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.५० टक्के झाला अाहे. रेपो दर वाढवल्याने अारबीअायकडून बँकांना मिळणारं कर्जावरील व्याजदरात वाढ होऊन बँकांना हे कर्ज महाग होणार अाहे. त्यामुळे बँका याचा भार अापल्या ग्राहकांवर टाकतील. परिणामी सर्वच बँकांचं गृह, वाहन अाणि वैयक्तिक कर्ज महाग होणार अाहे.

जीडीपी ७.४ टक्के राहील

एप्रिल - सप्टेंबर या कालावधीत देशाचा जीडीपी ७.५ ते ७.६ टक्के राहण्याचा अंदाज अारबीअायने वर्तवला अाहे. अार्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीडीपी ७.४ टक्के राहील असं अनुमान अारबीअायनं कायम ठेवलं अाहे. तर चालू अार्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई ४.८ टक्के राहील, असं अारबीअायने म्हटलं अाहे. 


२० लाखांच्या गृहकर्जावर ३२१ रुपये ईएमअाय वाढणार 


कर्ज   (२० वर्ष मुदतीचे)सध्याच्या व्याजदर (८.७५%) प्रमाणे ईएमअाय नवीन व्याजदर (९ %) प्रमाणे ईएमअाय    ईएमअायमध्ये वाढ
२० लाख रु.     १७,६७४ रुपये      १७,९९५  रुपये  ३२१ रुपये
३० लाख रु.    २६,५११ रुपये         २६,९९२ रुपये   ४८१ रुपये
५० लाख रु. ४४,१८६ रुपये  ४४,९८६ रुपये८०० रुपये

                          


हेही वाचा - 

रिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजार भागभांडवल ७.४३ लाख कोटींवर
संबंधित विषय
ताज्या बातम्या