Advertisement

ईएमआयवर आणखी 3 महिने सूट?

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरबीआयने सर्व कर्जांवर 3 महिन्यांची सूट दिली होती. ही स्थगितीची परवानगी आणखी तीन महिन्यासाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

ईएमआयवर आणखी 3 महिने सूट?
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात तिसऱ्यांदा लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच ठप्प आहे. परिणामी अनेकांचे कर्जाचे ईएमआय थकणार असल्याने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरबीआयने सर्व कर्जांवर 3 महिन्यांची सूट दिली होती.  बँकाना आरबीआयने वाहन, गृह किंवा इतर मुदत कर्जांचा ईएमआय 3 महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी दिली होती. आरबीआयच्या सूचनेचं पालन करत अनेक बँकांनी ग्राहकांना तीन महिन्याच्या ईएमआयसाठी सूट दिली होती.

आरबीआयकडून देण्यात आलेली ही स्थगितीची परवानगी आणखी तीन महिन्यासाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आरबीआयकडून याबाबत निर्णय येऊ शकतो.  लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात तीन महिन्यासाठी कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यात आले होते. सर्व वाणिज्य बँका, सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) यांना ईएमआय स्थगिती देण्यास परवानगी देण्यात आली होती. ग्राहकांना याकरता अर्ज करण्याची गरज नव्हती.

गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे, वाहन आणि ज्यामध्ये मुदतीचा कालावधी आहे अशा कर्जांचा सवलतीत समावेश आहे. यात मोबाईल, फ्रीज, टीव्ही इ. वरील ईएमआयचाही समावेश आहे. आता हा निर्णय झाल्यास आणखी तीन महिन्यासाठी ईएमआय पुढे ढकलला जाऊ शकतो. परिणामी सामान्यांना या कठीण प्रसंगात मोठा दिलासा मिळेल.



हेही वाचा -

Maharashtra Breaking | 531 रक्षकच कोरोनाच्या विळख्यात...

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा