Advertisement

कोचर यांच्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांचा ११ हजार कोटींचा फायदा

आयसीआयसीआय बँकेने ५७ वर्षांचे संदीप बक्षी यांची एमडी आणि सीईओ पदावर ५ वर्षांसाठी नेमणूक केली आहे. बक्षी याआधी आयसीआयसीआय बँकेत चीफ आॅपरेटींग आॅफिसर (सीओओ) होते. तर २०१० पासून ते 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शोरन्स'चे एमडी आणि सीईओ होते.

कोचर यांच्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांचा ११ हजार कोटींचा फायदा
SHARES

आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकेच्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा बँकेच्या संचालक मंडळाने गुरूवारी मंजूर केला आहे. व्हिडिओकाॅन कर्ज वाटप प्रकरणी सध्या कोचर यांची चौकशी सुरू असून त्या जूनपासून सुट्टीवर होत्या. हे प्रकरण अंगलट आल्यानेच त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं म्हटलं जात आहे. कोचर यांच्या जागी आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने संदीप बक्षी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नेमणूक केली आहे. या वृत्तामुळे आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये ६ टक्के वाढ होऊन गुंतवणूकदारांना ११ हजार कोटी रुपयांहून जास्त रुपयांचा फायदा झाला.


व्हिडिओकाॅन कर्जवाटप चर्चेत

व्हिडिओकाॅन कंपनीला कर्ज देण्यावरून चंदा कोचर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. सोबतच त्यांच्या पतीच्या कंपनीला कर्ज देताना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकाॅन समुहाला ३२५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं असून हे कर्ज फेडण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. त्यानंतर व्हिडिओकाॅनच्या मदतीने बनलेली एक कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या ट्रस्टच्या नावे करण्यात आल्याचाही आरोप आहे.


कोण आहेत दीपक बक्षी?

आयसीआयसीआय बँकेने ५७ वर्षांचे संदीप बक्षी यांची एमडी आणि सीईओ पदावर ५ वर्षांसाठी नेमणूक केली आहे. बक्षी याआधी आयसीआयसीआय बँकेत चीफ आॅपरेटींग आॅफिसर (सीओओ) होते. तर २०१० पासून ते 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शोरन्स'चे एमडी आणि सीईओ होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९८६ मध्ये याच बँकेतून केली होती.


११ हजार कोटींचा फायदा

कोचर यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ६ टक्क्यांनी वधारले. बुधवारी आयसीआयसीआय बँकेची मार्केट कॅप १, ९५, ३३९.६२ कोटी रुपये होती. ही कॅप वाढून २, ०६, ४७०. ६३ इतकी झाली. म्हणजेच गुंतवणूकदारांना ११, १३१ कोटी रुपयांचा फायदा झाला.



हेही वाचा-

'आयसीआयसीआय'ला ५८ कोटींचा दंड

अबब..! चंदा कोचर यांना दिवसाला 2.1 लाख पगार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा