मुंबई - जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलल्यानंतर आता बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गंगाजळी जमा होतेय. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये गुरुवारी एका दिवसात 18 हजार कोटी जमा झालेत. सेव्हिंग अकाऊंटमध्ये अकरा हजार कोटी तर करंट अकाऊंटमध्ये 7 हजार कोटी जमा झालेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसबीआय बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिलीय. तसंच एसबीआयचे एटीएम पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आखणी तीन - चार दिवस लागणार आहेत, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.