Advertisement

एसबीआयची नवीन सुविधा, घर बसल्या चेक पेमेंट थांबवता येणार

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाईन सुविधा देत आहे. आता बँकेने आणखी एक सुविधा ग्राहकांना दिली आहे.

एसबीआयची नवीन सुविधा, घर बसल्या चेक पेमेंट थांबवता येणार
SHARES

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाईन सुविधा देत आहे. आता बँकेने आणखी एक सुविधा ग्राहकांना दिली आहे. चेक पेमेंट (check payment) थांबवण्याची सुविधा बँकेने दिली आहे. यासाठी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.

एसबीआयच्या ग्राहकांना आता घर बसल्या चेक पेमेंट थांबवता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचा मोबाईल क्रमांक (mobile number) बँक खात्याशी (bank account) संलग्नित असण्याची आवश्यकता आहे. तरच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहक चेक पेमेंट थांबवण्यासाठी योनो किंवा योनो लाइट ॲपचादेखील वापर करु शकतात. 

इंटरनेट बँकिंगद्वारे थांबवले जाऊ शकते चेक पेमेंट

- चेक पेमेंट थांबवण्यासाठी एसबीआयच्या onlinesbi.com या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

- त्यानंतर e Service सेक्शन वर गेल्यावर Stop Cheque Payment पर्यायावर क्लिक करा.

-  ज्या खात्यातून चेक जारी करण्यात आला ते खाते निवडा.

-  यानंतर 'स्टार्ट चेक नंबर' आणि 'एंड चेक नंबर' विचारेल.

- आता चेकचा प्रकार निवडावा.

- ग्राहकाला येथे चेक थांबविण्याचे कारण द्यावे लागेल. यासाठी ग्राहक 'स्टॉप कॉज' पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो.

-  ही सेवा विनामूल्य नाही. सर्विस कंफर्म होताच आपल्या बँक खात्यातून चार्ज कट करण्यात येईल.

- शेवटी 'सबमिट करा' वर क्लिक करा आणि तुमच्या विनंतीचा तपशील - पडताळण्यासाठी ओके वर क्लिक करा.

- बँकेने विनंती स्वीकारल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर संदर्भ क्रमांक आणि इतर महत्त्वपूर्ण तपशीलांचा एक संदेश येईल. ज्यामध्ये हे यशस्वीरित्या सबमिट केली गेली असल्याचा मॅसेज येईल.

एसबीआय योनोमधून अशी करा प्रक्रिया

- SBI Yono App वर लॉग इन करा.

- Request पर्यायावर क्लिक करून Cheque Book वर जा. Stop Cheque सिलेक्ट करा.

- खाते क्रमांक निवडा.

- चेक नंबरचे सुरुवातीचे आणि शेवटचे चार अंक भरा.

- चेक पेमेंट थांबविण्याचे कारण लिहा.

- Submit वर क्लिक करा. आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल, लिहिल्यानंतर, पेमेंट प्रक्रिया थांबविली जाईल.

बँकेत जाऊन थांबवता येईल चेक पेमेंट

ग्राहकाला चेक पेमेंट  थांबवण्याचा हा शेवटचा पर्याय आहे. बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज द्यावे लागेल. यासाठी बँक तुमच्याजवळून काही रक्कम वसूल करेल. हेही वाचा -

जेट एअरवेज पुन्हा उडणार? NCLTनं स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा