Advertisement

बनावट बँक अधिकाऱ्यापासून सावधान, एसबीआयने दिला ग्राहकांना अलर्ट

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे संकट वाढले आहे. अनेकांची फसवणूक देखील करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना अलर्ट करण्यात येत आहे.

बनावट बँक अधिकाऱ्यापासून सावधान, एसबीआयने दिला ग्राहकांना अलर्ट
SHARES

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे संकट वाढले आहे. अनेकांची फसवणूक देखील करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना अलर्ट करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानेत्यांच्या ग्राहकांना फसवणुकीबाबत सावधान केलं आहे. बनावट बँक अधिकारी सांगून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचं एसबीआयने सांगितलं आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून हे भामटे ग्राहकांच्या फोन स्क्रीनचा रिमोट अ‍ॅक्सेस मिळवत आहेत. याबाबत सावधिरी बाळगण्याचं आवाहन एसबीआयने केलं आहे.

एसबीआयने ट्विटर करून आपल्या ग्राहकांना सावधगिरीचा अलर्ट दिला आहे.  एसबीआयने सांगितलं की,  बनावट बँक अधिकारी बनून भामटे ग्राहकांना कॉल करतात. तुमचं  वॉलेट किंवा बँक केवायसी अवैध असून डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचं ते सांगतात. तुमची ही समस्या आम्ही ऑनलाइन सोडवू असं सांगून ते ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर ते ग्राहकांना एक मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. या अ‍ॅपमुळे हे भामटे तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस मिळवू शकतात आणि त्यानंतर बँक डिटेल्स वापरून तुमच्या खात्यातील रक्कम त्यांच्या खात्यामध्ये  ट्रान्सफर केली जाते. यासाठी लागणाला ओटीपी देखील त्यांना सहज मिळून जातो कारण तुमच्या मोबाइलचा अ‍ॅक्सेसच त्यांच्याकडे आहे.

अशी फसवणूक झाल्यास  epg.cms@sbi.co.in आणि report.phishing@sbi.co.in. यावर तुम्ही मेल करून तक्रार दाखल करू शकता. त्याचप्रमाणे https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाइटवर जाऊन देखील तक्रार नोंदवता येईल, असं एसबीआयने सांगितलं आहे. 

एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना असा इशारा दिला आहे की, फोन कॉल/ई-मेल/एसएमएस/ वेब लिंकच्या माध्यामातून कोणालाही तुमचे बँक डिटेल्स देऊ नका. इंटरनेटवर देण्यात आलेल्या बँकेच्या नंबरवरही विश्वास ठेऊ नका. बँके संबधित काही काम असल्यास बँकेचे अधिकृत फोन अ‍ॅप आणि वेबसाइट वापरा. YONO SBI, YONO Lite आणि BHIM SBI Pay अ‍ॅप आहेत. तर https://bank.sbi/ ही अधिकृत वेबसाइट आहे. ग्राहकांनी केवळ कस्टमर केअर टोल फ्री नंबर- 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 आणि टोल नंबर- 080-26599990 यावरच संपर्क करावा.



हेही वाचा -

Maharashtra Breaking | 531 रक्षकच कोरोनाच्या विळख्यात...

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा