Advertisement

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआयचे गृहकर्ज स्वस्त, 'इतका' झाला व्याजदर

आयसीआयसीआय बँकेने मागील दहा वर्षांतील सर्वात स्वस्त गृहकर्ज व्याजदर जाहीर केला आहे. यानुसार ग्राहक ७५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआयचे गृहकर्ज स्वस्त, 'इतका' झाला व्याजदर
SHARES

स्टेट बँकेने (एसबीआयने) आपल्या गृहकर्ज व्याजदरात नुकतीच मोठी कपात केली आहे. त्यानंतर आता एचडीएफसी, कोटक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. 

आयसीआयसीआय बँकेने मागील दहा वर्षांतील सर्वात स्वस्त गृहकर्ज व्याजदर जाहीर केला आहे. यानुसार ग्राहक ७५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ६.७० टक्के व्याजदर असेल. तर ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी ग्राहकांना ६.७५ टक्के व्याज द्यावे लागेल. हा सुधारित गृह कर्जाचा व्याज दर ३१ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध आहे. बँकेचा नवीन दर ५ मार्चपासून लागू झाला आहेत.

आयसीआयसीआय बँकेच्या या विशेष ऑफरमध्ये, जे ग्राहक आधीच बँकेचे ग्राहक नाहीत ते देखील डिजिटल माध्यमातून होम लोनसाठी अर्ज करू शकतात. असे ग्राहक बँकेच्या वेबसाइटवरुन किंवा मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या iMobile Pay वरून गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात.

मागील आठवड्यात एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर कमी केला आहे. या आठवड्यात एचडीएफसी बँकेने देखील व्याजदर घटवला आहे.  एसबीआय आणि एचडीएफसी बँकेने गृहकर्जावरील व्याज अनुक्रमे ७.७ टक्के आणि ६.७५ टक्के केला आहे. तर कोटक महिंद्रा बँक ६.६५ टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा