Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

एटीएम कार्डशिवायही काढा पैसे, 'ह्या' बँका देत आहेत सुविधा

एटीएम कार्ड न वापरता आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एटीएम कार्डशिवायही काढा पैसे, 'ह्या' बँका देत आहेत सुविधा
SHARES

एटीएम कार्डचा वापर न करता तुम्ही पैसे काढू शकता असा कधी विचार तुम्ही कधीच केला नसेल. पण असं केल जाऊ शकतं. डेबिट आणि क्रेडिट कार्डाशिवायही तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता.

एटीएम कार्ड क्लोनिंग करून एटीएम मशिनमधून पैसे काढण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम कार्ड न वापरता आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 भारतीय स्टेट बँक (एसबीआय), आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा (बीओबी) आपल्या ग्राहकांना कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा मिळण्यासाठी ग्राहकांना संबंधित बँकेचं मोबाइल अॅप डाऊनलोड करावं लागेल.


एसबीआय

- ग्राहकांना एसबीआयचे इंटरनेट बँकिंग अॅप योनो (YONO) डाउनलोड करावं लागेल.
- व्यवहार सुरू करण्यासाठी तुम्हाला 'योनो कॅश ऑप्शन' वर जावं लागेल.
- यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जाऊन किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम तेथे टाका.
- एसबीआय तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर योनो कॅश ट्रांजेक्शन क्रमांक पाठवेल.
- हा नंबर चार तासांसाठी वैध असेल.
- एसबीआयच्या एटीएमवर जाऊन एटीएम स्क्रीनवर YONO Cash हा पर्याय निवडा.
- यात YONO कॅश ट्रांजेक्शन नंबर टाका.
- योनो कॅश पिन टाका आणि Submit वर क्लिक करा.
- त्यानंतर एटीएममधून रोख रक्कम घ्या.
- एसबीआय कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा केवळ एसबीआय एटीएममध्ये वापरली जाऊ शकते.
- एसबीआय ग्राहक किमान 500 आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकतात.

आयसीआयसीआय बँक

- बँकेचे मोबाईल अॅप ‘iMobile’ च्या माध्यमातून पैसे कार्डशिवाय काढता येतील.
- iMobile अ‍ॅपवर लॉग इन करा
- ‘Services’ and ‘Cash Withdrawal at ICICI Bank ATM हा पर्याय निवडा
- आपला खाते क्रमांक निवडा, 4 अंकी तात्पुरता पिन तयार करा आणि सबमिट करा.
- आपल्याला त्वरित ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळेल.
- त्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर जा आणि कार्डलेस कॅश पैसे काढणे पर्याय निवडा.
- मोबाइल नंबर टाकून क्लिक करा.
- आपला तात्पुरता पिन भरा आणि रक्कम टाका
- या सुविधेच्या माध्यमातून 20 हजार रुपयापर्यंत पैसे काढू शकता.

बँक ऑफ बडोदा

- BOB M मोबाइल बँकिंग अॅप डाऊनलोड करा
- मोबाइल बँकिंगवर लॉग इन करा आणि प्रीमियम सर्व्हिसेस टॅब वर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवरील मोबाइल सेवेवर क्लिक करा.
- आपला खाते क्रमांक निवडा, रक्कम प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- त्यानंतर बँक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल.
- बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये जाऊन एटीएम स्क्रीनवरील मोबाइल कॅश ऑन पर्याय निवडा.
- आपल्या मोबाइल नंबरवर पाठविलेला ओटीपी भरा करा आणि रक्कम टाका

कोटक महिंद्रा बँक

- कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना मोबाइल अ‍ॅप किंवा नेट बँकिंगद्वारे लॉग इन करावे लागेल.
- त्यानंतर लाभार्थ्याची नोंदणी करावी लागेल. यामध्ये लाभार्थ्यांचे नाव, मोबाइल नंबर आणि पत्ता भरावा लागेल.
- नोंदणीनंतर नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अ‍ॅपद्वारे इन्स्टंट मनी ट्रान्सफर सुरू केले जाऊ शकते.
- त्यानंतर ग्राहकांना एक ओटीपी मिळेल
- यानंतर बँकेच्या एटीएममधील कार्डशिवाय पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
- सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर ग्राहक पैसे काढू शकतील.हेही वाचा -

लस घेणाऱ्यांना मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची योजना

लस घेणाऱ्यांना मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची योजनाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा