Advertisement

एनईएफटी, आरटीजीएस ट्रान्जॅक्शन झाले स्वस्त!


एनईएफटी, आरटीजीएस ट्रान्जॅक्शन झाले स्वस्त!
SHARES

जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वस्तू आणि सेवांच्या वाढलेल्या किंमतींमुळे जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या एनइएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस या सेवांवरही जीएसटी लागू झाल्यामुळे बँकांच्या खातेदारांमध्ये नाराजी होती. मात्र देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात भारतीय स्टेट बँकेने आपल्या खातेदारांसाठी खूशखबर आणली आहे.

स्टेट बँकेने एनईएफटी आणि आरटीजीएस सेवांवरील दर तब्बल 75 टक्क्यांनी कमी केले आहेत. येत्या 15 जुलैपासून नवे दर लागू केले जातील अशी माहिती एसबीआय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या खातेदारांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत.

एसबीआयने याआधीच मोबाईल बँकिंगच्या मदतीने होणाऱ्या फंड ट्रान्सफरवरच्या दरांमध्येही कपात केली आहे. 1 हजार रुपयांपर्यंतच्या फंड ट्रान्सफरवर आता कोणत्याही स्वरुपातील दर आकारले जाणार नाहीत. 1 जुलैपासून हा नियम लागू झाल्याचंही बँक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

आत्ताच्या घडीला एसबीआयचे सुमारे सव्वा तीन कोटी खातेदार ऑनलाईन बँकिंग सेवेचा वापर करत आहेत. तर, 2 कोटी खातेदार मोबाईल बँकिंग सेवेचा वापर करत आहेत.


सध्याचे दर

एनईएफटी

10 हजारापर्यंत
2.50 रुपये
1 लाखापर्यंत
5 रुपये
2 लाखापर्यंत
15 रुपये
2 लाखाहून अधिक
25 रुपये


आरटीजीएस

2 ते 5 लाख
25 रुपये
5 लाखाहून अधिक
51 रुपये


दरम्यान, ट्विटरकरांनी एसबीआयच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे...





हेही वाचा

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना दगड आणि चपला देणारा भामटा गजाआड

ऑनलाईन तिकीट बुक केल्यास सर्व्हिस टॅक्स नाही !


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा