• एचडीएफसी बँकेबाहेर सुरक्षा वाढवली
  • एचडीएफसी बँकेबाहेर सुरक्षा वाढवली
  • एचडीएफसी बँकेबाहेर सुरक्षा वाढवली
SHARE

मालाड - पाचशे, हजारांच्या नोटा बँकेत बदलण्यावरून झालेल्या वादात मालाड पश्चिमेकडील लिंक रोड येथील एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याला आपलं बोट गमवावं लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेनंतर बँकेत सुरक्षा वाढवण्यात आलीय.

नोटा बदलण्यसाठी बँकेबाहेर रांग लागली होती. एका वेळी दोन ते तीन जणांना आत सोडत असल्यामुळे एका महिलेने सुरक्षारक्षकाशी वाद घातला. तो वाद सोडवायला गेले, त्यावेळी त्या महिलेने बँकेचे दार जोरात बंद केले, त्यावेळी अधिकाऱ्याचे बोट दारात अडकले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी त्या महिलेला अटक केली असून तिची जामिनावर सुटका झाली. याबाबत मालाड लिंक रोड येथील एचडीएफसी बँक व्यवस्थापनाने काही बोलण्यास नकार दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या