Advertisement

बँकांमध्ये जमा रकमेविषयी आरबीआयचं मौन संशयास्पद?


बँकांमध्ये जमा रकमेविषयी आरबीआयचं मौन संशयास्पद?
SHARES

मुंबई - नोटबंदीच्या निर्णयानंतर देशातल्या बँकांमध्ये किती रक्कम जमा झाली आहे याची माहिती देण्यास आरबीआयने नकार दिला आहे. आरबीआयने केलेल्या दाव्यानुसार ही माहिती उघड केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरबीआयच्या या भूमिकेला आव्हान दिले आहे.

नोटबंदीच्या निर्णयानंतर कोणत्या बँकेत किती रक्कम जमा झाली याबाबतची माहिती अनिल गलगली यांनी आरबीआयकडे मागितली होती. मात्र आरबीआयचे केंद्रीय जन माहिती अधिकारी पी. विजय कुमार यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. आरटीआय एक्ट 2005 चे कलम 8(1) (छ) अंतर्गत सदर माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. दरम्यान अनिल गलगली यांनी या अजब दाव्यावर आक्षेप घेत आरबीआयच्या मुद्रा प्रबंध विभागाच्या कार्यपाल संचालक डॉ. दीपाली पंत जोशी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा