Advertisement

नोटबंदीचा नोंदणी, मुद्रांक विभागाला फटका


नोटबंदीचा नोंदणी, मुद्रांक विभागाला फटका
SHARES

मुंबई - मुंबईसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, म्हाडा, बेस्ट, एसटी सर्वच सरकारी यंत्रणाची तिजोरी फुगत असताना नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला मात्र नोटबंदीचा फटका बसतोय. आठवड्याभरात मुंबईसह राज्यातील मुद्रांक शुल्काच्या महसुलात 40 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक एन. रामास्वामी यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. दररोज 6000 दस्तांची नोंदणी व्हायची, तोच आकडा आठवड्याभरात 3,500वर आला आहे. मु्द्रांक शुल्काचा भरणा आणि नोंदणी शुल्क ऑनलाइनही स्वीकारलं जातं. तर कागदपत्रांच्या हाताळणीसाठी एका प्रतिसाठी 20 रुपये डीडीद्वारे स्वीकारले जातात. त्यामुळे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी रोकड लागत नसतानाही मालमत्ता खरेदीधारकांनी नोटाबंदीचा धसका घेतल्याने महसुल घटल्याची शक्यताही या निमित्ताने व्यक्त होत आहे. तर येत्या आठवड्याभरात नोटाबंदीची परिणाम कमी होईल आणि मुद्रांक शुल्क महसुलातही वाढ होईल, असा विश्वास रामास्वामी यांनी व्यक्त केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा