Advertisement

युथ आयकॅान आलिया भटसह स्टार प्लसचा नवीन लोगो


युथ आयकॅान आलिया भटसह स्टार प्लसचा नवीन लोगो
SHARES

आयपीलच्या अंतिम सामन्यापूर्वी रविवारी भारतातील लोकप्रिय वाहिनी असलेल्या स्टार प्लसने आपला नवीन लोगो प्रस्तुत केला. यावेळी 'रिश्ता वही सोच नयी' ही टॅग लाईन या लोगोसोबत प्रस्तुत करण्यात आली. 

नव्या पिढीची युवा आयकॉन असलेली अभिनेत्री आलिया भटला 'स्टार प्लस'ने आपल्या वाहिनीचा चेहरा बनवला आहे. चमकदार लाल रंगामध्ये हा लोगो बनवण्यात आला आहे.


 

स्टार प्लसवरील रिश्ता वही बात नयी या टॅगलाईनला संगीत ए. आर. रहेमान यांनी दिलं आहे, तर सुनिधी चौहान आणि चांदनी आरएमडब्लू यांनी हे गाणं गायलं आहे. राम संपत यांनी या गाण्याला कंपोज केलं तर स्वानंद किरकिरे यांनी या गाण्याची रचना केली आहे. सबसे स्मार्ट कौन, कयामत की रात आणि दिल है हिंदुस्तानी सिजन 2 हे नवीन कार्यक्रम लवकरच स्टार प्लसवर सुरू होणार आहे.


स्टार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता म्हणाले 'आम्ही पुन्हा एकदा युवा आणि महत्त्वाकांक्षी भारतासाठी मनोरंजनाची एक नवीन दुनिया घेऊन सज्ज झालो आहोत. समाजाला नवीन दिशा देणाऱ्या जुन्या परंपरांना मोडीत काढणाऱ्या कथा सादर केल्या जातील. याच विचाराला लक्षात घेऊन स्टार प्लस या चॅनलने आलिया भटसारख्या युथ आयकॉनला आपली ब्रॅण्ड इमेज म्हणून प्रस्तुत केलं आहे'




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा