Advertisement

शेतकरी आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर ?


SHARES

मुंबई - भाजपा सरकारने मोठा गाजावाजा करत आठवडे बाजाराची संकल्पना आणली होती. पण, आता हेच आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण आठवडे बाजार भरवली जाणारी ठिकाणं योग्य मूल्यमापन न करता ठरवली जातात. आठवडी बाजाराची प्रचार आणि प्रसिद्धी करण्याची जबाबदारी असणारे पणन महामंडळ नवीन बाजार भरवताना थातूर मातुर पत्रके वाटून बाजारासाठी मार्केटिंग करतं. त्यानंतर या आठवडी बाजाराचे पुढे कुठलेही मार्केटिंग महामंडळातर्फे केले जात नाही. त्यामुळे आठवडी बाजार स्थानिकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचत नाही. शेवटी त्याचे परिणाम आठवडी बाजारातला शेतमाल भरपूर प्रमाणात उरतो आणि शेतकऱ्याला प्रचंड नुकसान होते.

राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या 92 आठवडी बाजारांपैकी 23 आठवडी बाजार मुंबई महापालिका परिसरात आहेत. तरी देखील आठवडे बाजांराची सद्यस्थिती वाईट आहे. मुंबईतील विधानसभा परिसर, वरळी आणि अगदी दोन- चार इतर ठिकाणे सोडली तर बाजाराला मिळणारा प्रतिसाद अगदी कमी आहे. तर, श्री संत शिरोमणी शेतकरी आठवडी बाजार शासनाच्या नकारार्थी धोरणामुळे काही ठिकाणी आठवडी बाजार बंद पडले आहेत आणि बंद होण्याच्या मार्गावर आहेत असं सांगण्यात आलं आहे.

अंधेरी, कन्नमवारनगर, योगीनगर, शिंपोली, दहिसर, मुलुंड इत्यादी ठिकाणचे आठवडे बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर, ठाण्यातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळतेय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा