दादर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि एकच खळबळ उडाली. अचानक नोटा बंद झाल्याने फळवाला असो किंंवा दुकानदार सगळ्यांना काही अंशी तोट्याचा सामना करावा लागला. मग याला सिनेमागृह तरी कसे अपवाद ठरतील. यावर तोडगा काढण्यासाठी ' तुम बिन २ ' ह्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललीय, तर दुसरीकडे 'रॉक ऑन 2' च्या निर्मात्यांनी नवीन शक्कल काढली. ज्यांना तिकीट विकत घेणं शक्य नसेल त्यांना ऑनलाईन तिकीटची सुविधा PVR च्या 23 चित्रपटगृहात करण्यात आलीय..आणि त्यासाठी अतिरक्त पैसे ही आकारण्यात येणार नाहीत. असो एकंदरीतच काय मोंदींच्या या काळ्या पैश्यांच्या सर्जिकलं स्ट्राईकचा फटका काही अंशी सिनेमानांही बसलाय हे मात्र नक्की.