Advertisement

वसई-विरार हे सर्वात कमी 4G नेटवर्क मिळणारं शहर

देशातील ५० शहरांच्या यादीमध्ये सर्वात कमी नेटवर्क मिळणारं शहर म्हणजे मुंबई जवळील वसई-विरार शहर. या शहरात केवळ ८७ टक्के 4G नेटवर्क मिळतं.

वसई-विरार हे सर्वात कमी 4G नेटवर्क मिळणारं शहर
SHARES

भारतात नागरिकांना चांगलं नेेटवर्क मिळावं यासाठी २०१६ मध्ये रिलायन्स जिओनं 4G नेटवर्क लाँच केलं होतं. जिओनं लाँच केलेल्या 4G नेटवर्कमुळं 4G च्या ग्राहकांमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळं अन्य कंपन्यांनी देखील भारतात 4G नेटवर्क लाँच केलं आहे. मात्र, काही ठिकाणी टॉवर नसल्यामुळं व्यवस्थित नेटवर्क मिळत नाही. त्यामुळं नागरिकांमध्ये भारतात कोणत्या ठिकाणी चांगलं नेटवर्क मिळतं ? याबाबत चर्चा रंगलेली असते. याबाबत ब्रिटनची वायरलेस कव्हरेज मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलनं एक अहवाल तयार केला असून, भारतातील ५० ठिकाणी 4G नेटवर्क कसं मिळतं, याची आकडेवारी दिली आहे.


धनबाद पहिल्या क्रमांकावर

ब्रिटनची वायरलेस कव्हरेज मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलच्या अहवालानुसार, धनबाद या शहरात 4G नेटवर्क व्यवस्थित मिळत असून, हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी ९५.३ टक्के 4G नेटवर्क मिळतं. दुसऱ्या क्रमांकावर झारखंडची राजधानी रांची आहे. या ठिकाणी ९५ टक्के नेटवर्क मिळतं. तसंच, देशातील ५० शहरांच्या यादीमध्ये सर्वात कमी नेटवर्क मिळणारं शहर म्हणजे मुंबईजवळील वसई-विरार शहर. या शहरात केवळ ८७ टक्के 4G नेटवर्क मिळतं.  


मुंबईत ८९.७ टक्के नेटवर्क 

4G नेटवर्क मुंबईमध्ये ८९.७ टक्के मिळतं. नागपूरमध्ये ९०.३ टक्के, औरंगाबादमध्ये ८९.६ टक्के, नवी मुंबईत ८८.९ टक्के, श्रीनगरमध्ये ९४.९ टक्के 4G नेटवर्क मिळत असून, हे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. कोलकातामध्ये ९३.३ टक्के, बेंगळुरूमध्ये ९२.३ टक्के, चेन्नईत ९१.१ टक्के, दिल्लीत ८९.८ टक्के 4G नेटवर्क मिळतं.



हेही वाचा -

७ एप्रिलला रंगणार ६ वी सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा

रे रोड ठरलं वायफाय असलेलं हजारावं हायफाय स्टेशन!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा