सुट्ट्या पैशासाठी ग्राहकांची लूट


  • सुट्ट्या पैशासाठी ग्राहकांची लूट
  • सुट्ट्या पैशासाठी ग्राहकांची लूट
  • सुट्ट्या पैशासाठी ग्राहकांची लूट
SHARE

परळ - सुट्ट्या पैशासाठी फेरीवाल्यांनी ग्राहकांना अक्षरश: लुटलंय. परळ पूर्वमधील केइएम रुग्णालासमोर फूटपाथवर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरिवाल्यांनी चक्क ५०० रुपयांच्या नोटीमागे १०० रुपये कट केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. नाईलाजाने केइएममध्ये येणाऱ्या रुग्णांनी ही अट मान्य करत खाद्यपदार्थ खरेदीही केलेत. त्यामुळे मोदीनी घेतलेल्या निर्णयाचा या फेरिवाल्यांनी पुरेपुर फायदा करून घेतल्याचे निदर्शनास आलं. दरम्यान सगळ्यांनी नोटा स्वीकारणं बंद केलं मात्र आम्ही घेतोय मग आमचा फायदा नको का अशी प्रतिक्रीया ज्यूस विक्रेता सुरतलाल याने दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या