Advertisement

सर्व कर्ज फेडतो पण खटला बंद करा, विजय मल्ल्याची सरकारला ऑफर

देशातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने आता पुन्हा एकदा कर्ज फेडण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

सर्व कर्ज फेडतो पण खटला बंद करा, विजय मल्ल्याची सरकारला ऑफर
SHARES

देशातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने आता पुन्हा एकदा कर्ज फेडण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. आपण शंभर टक्के कर्ज फेडण्यास तयार आहोत, मात्र माझ्यावर सुरू असलेले खटले मागे घ्यावेत, अशी ऑफर त्याने ट्टिट करून सरकारला दिली आहे. यापूर्वी डिसेंबर 2018 आणि मार्च 2020 मध्ये थकित कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली होती.

 मल्ल्याने भारताच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबद्दल सरकारचं अभिनंदनही केलं आहे. भारत सरकार त्यांना हव्या तेवढ्या चलनी नोटा छापू शकतं पण माझ्या सारख्या लहान घटकाकडे, जो त्याचं 100 टक्के थकित कर्ज परतफेड करायला तयार आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय माझ्याकडे थकित असलेल्या कर्जाची रक्कम स्वीकारा आणि माझ्याविरुद्ध सुरु असलेली सर्व प्रकरणे थांबवा, असं विजय मल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने सरकारी बँकांचं हजारो कोटींचं कर्ज घेतलं होतं, जे परत केलं नाही. त्यामुळे त्याच्यावर पैशांची अफरातफर आणि फसवणूक असे खटले चालू आहेत. त्याच्याकडून नऊ हजार कोटींची वसुली होणार आहे. यावर कोणत्याही अटी विना कर्ज घ्या आणि खटला बंद करा, अशी ऑफर त्याने दिली.

ब्रिटनमधील न्यायालयात त्याचं भारतात हस्तातरण करण्याविषयीचा खटला अंतिम टप्प्यात आहे. लंडनच्या हायकोर्टातील हस्तांतरणाला विरोध करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर विजय मल्ल्याने ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


हेही वाचा -

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा