Advertisement

'इन्फोसिस'चे सीईओ सिक्का यांचा राजीनामा


'इन्फोसिस'चे सीईओ सिक्का यांचा राजीनामा
SHARES

देशातील सर्वात नामांकित सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विशाल सिक्का यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिक्का यांचा राजीनामा स्वीकारत त्यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी करण्यात आल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर शेअर बाजार मोठी घसरण पाहायला मिळत आहे.




आता त्यांच्या जागेवर हंगामी सीईओ आणि एमडी म्हणून यू. बी. प्रवीण राव यांची नियुक्ती करण्याती आली आहे. कंपनीच्या पूर्णवेळ सीईओ आणि एमडीची नेमणूक 31 मार्च 2018 पूर्वी करण्यात येईल असा दावा कंपनीने केला आहे.

विशाल सिक्का यांची 1 ऑगस्ट 2014 रोजी इन्फोसिसच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. इन्फोसिसमध्ये येण्याआधी ते जर्मनीतील सॅप कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यकारी सदस्य होते.


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा