Advertisement

...मुंबई इनको जम गयी!


...मुंबई इनको जम गयी!
SHARES

मुंबई - वैविध्याने नटलेल्या देशाच्या आर्थिक राजधानीने वर्ल्ड बँकेच्या सीईओ क्रिस्तलिना जॉर्जिव्हा यांनाही भुरळ घातलीच. क्रिस्तलिना यांंनी मंगळवारी मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास केला. या ताज्या अनुभवाची खुमारी त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होती. आपल्याला पुन्हा मुंबईवारी आणि त्यातूनही रेल्वेने प्रवास करायला आवडेल, हे सांगणाऱ्या क्रिस्तलिना जॉर्जिव्हा यांनी नियमित गर्दीत चेंगरत रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व्यथेकडेही डोळेझाक केली नाही. राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह 'सह्याद्री' मध्ये झालेल्या सयुक्त पत्रकार परिषदेत क्रिस्तलिना जॉर्जिव्हा यांनी मुंबईकरांच्या जीवनशैलीबाबत आपलं निरीक्षण नोंदवलं.

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत वर्ल्ड बँक महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहे. राज्यातील वेगवेगळ्या योजनेमध्ये वर्ल्ड बँकेने एकूण सात हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. मुंबईसारख्या शहरातील वेगवेगळ्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे. या गुंतवणूकीमुळे मुंबईकरांना सुखकर, सुरक्षित आणि चांगली सेवा प्रवासी म्हणून मिळेल, असा आशावाद जॉर्जिव्हा यांनी व्यक्त केला. मुंबईतील एमयुटीपी-3 या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सर्वसामान्य मुंबईकरांचे दिवसातले काही तास प्रवासात व्यतीत होतात. बस, रेल्वेसोबत आता मेट्रो, मोनो सारख्या दळणवळणाची साधनं उपलब्ध झाल्यानंतरही एकंदर वाहतुकीवरचा ताण म्हणावा तसा कमी झालेला नाही. आता वर्ल्ड बँकेने मोठा निधी दिल्यानंतर तरी एमयुटीपीचे रखडलेले उपक्रम रुळावर यावेत, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची वाजवी अपेक्षा आहे.


वर्ल्ड बॅंकेच्या सीईओची धारावीच्या शाळेला भेट

वर्ल्ड बँकेच्या सीईओचा रेल्वेने 'सेकंड क्लास' प्रवास


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा