मुंबईतील 128 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

  Mumbai
  मुंबईतील 128 अनधिकृत बांधकामांवर कारवाई
  मुंबई  -  

  मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खाते (आरई) द्वारे धडक कारवाई करून 128 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. महापालिकेच्या 19 विभागात ही कारवाई करून एकूण सुमारे 29 हजार चौ. फुटांची जागा मोकळी करण्यात आली.

  महापलिका उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोमवार 31 जुलै आणि मंगळवार 1 ऑगस्ट 2017 रोजी एकूण 128 व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. सोमवारी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान सुमारे 17 हजार 788 चौ. फूट एवढ्या एकूण क्षेत्रफळाची 80 बांधकामे तोडण्यात आली आहेत.

  तर मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 10 हजार 960 एवढ्या चौ. फू. आकाराची 48 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलिस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. यासाठी मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी संबंधित घटनास्थळी तैनात होते.


  या कारवाईसाठी सर्व 19 विभागांमध्ये महापालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी अव्याहतपणे कार्यरत होते.

  विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त (अ. नि.)  हेही वाचा -

  प्रकल्पबाधित दुकानदारांना गाळ्याऐवजी मिळणार आर्थिक नुकसान भरपाई

  वांद्र्यातील क्रिस्टल मॉलच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.