Advertisement

ठाण्यातील २० वर्ष जुनी इमारत केली खाली, ११ कुटुंबियांचं स्थलांतर

ही इमारत चार मजली इमारत कोसळण्याच्या मार्गावर होती आणि मोठ्या प्रमाणात इमारतीला भेगा पडल्या होत्या.

ठाण्यातील २० वर्ष जुनी इमारत केली खाली, ११ कुटुंबियांचं स्थलांतर
SHARES

ठाण्याच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षानं (RDMC) भिंतीला तडे गेलेली इमारत खाली केली. या इमारतीत ११ कुटुंबिय गेल्या २० वर्षांपासून राहत होते. ठाणे इथल्या सई आनंद अपार्टमेंटमध्ये नऊ खोल्या आणि तीन दुकानं आहेत. वृत्तानुसार, ही इमारत चार मजली इमारत कोसळण्याच्या मार्गावर होती आणि मोठ्या प्रमाणात इमारतीला  भेगा पडल्या होत्या.

इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची परिस्थिती हालाकिची आहे. मुसळधार पावसात नागरिकांच्या सुरक्षतेसाठी जवळच्या चाळीतील सदस्यांनाही ठाणे महानगर पालिकेच्य शाळेत स्थलांतरीत करण्यात आलं आहे.


हेही वाचा : मुंबईत ७ वर्षांत 'इतक्या' इमारती कोसळल्या


ठाण्यातील RDMC चे प्रमुख संतोष कदम यांनी याची पुष्टी केली आहे. यासंदर्भात कळताच RDMC, अग्निशमन विभाग आणि पोलिस ठाण्यांमधून बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईत अनेक इमारतींचे भाग कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतीच फोर्ट परिसारत एक ५ मजली इमारत कोसळली. यामध्ये जवळपास १० जणांचा मृत्यू झाला आहे. अजून काही जणं इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे. अग्निशमन दला तर्फे अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.



हेही वाचा

भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० वर

फोर्टमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना ५० हजार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा