Advertisement

मुंबईतील 'इतक्या' मॅनहोलवर संरक्षक जाळ्या नाही

मुंबईत घडल्यानं या मॅनहोलपासून पादचारी सुरक्षित राहावेत यासाठी काही मॅनहोलचवर संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकणी या जाळ्या बसविण्यात आलेल्या नाही.

मुंबईतील 'इतक्या' मॅनहोलवर संरक्षक जाळ्या नाही
SHARES

मुंबईत पावसाळ्यात जास्तीचा पाऊस पडल्यावर सखल भागांत प्रचंड पाणी साचतं. त्यामुळं पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढावी लागते. तसंच, यावेळी पाणी साचल्यानं रस्ता दिसत नाही, त्यामुळं 'मॅनहोल'ची भिती पादचाऱ्यांना सातावते. काही मॅनहोल उघडे असतात. त्यामुळं पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यात बुडून मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान अशा घटना मुंबईत घडल्यानं या मॅनहोलपासून पादचारी सुरक्षित राहावेत यासाठी काही मॅनहोलचवर संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकणी या जाळ्या बसविण्यात आलेल्या नाही.

मुंबईत ठिकठिकाणी लाखभर 'मॅनहोल' असताना पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या ठिकाणी, तेही केवळ पर्जन्य जलवाहिन्यांच्या प्रवेशिकांवरच संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानं संपूर्ण मुंबईत केवळ साडेतीन हजार ठिकाणीच जाळ्या बसवून झाल्या आहेत. संरक्षक जाळ्या नसलेले मलनि:सारण, जल, सांडपाणीचे मॅनहोलही अनेकदा पादचाऱ्यांकरिता तापदायक ठरतात; परंतु पालिकेने उद्दिष्टच मर्यादित केल्याने शहरात ठिकठिकाणी अजूनही मलनि:सारण, जल, सांडपाणीचे मॅनहोल संरक्षक जाळ्यांविना आढळत आहेत.

मुंबईतील हिंदमाता परिसरात मॅनहोल उघडे राहिल्यानं त्यात पडून प्रख्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीनं आपल्या अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. त्यात पर्जन्यजल वाहिन्यांच्या मनुष्य प्रवेशिकांना आतून जाळ्या बसवण्याची सूचना करण्यात आली. मॅनहोलच्या झाकणाच्या ५ इंच ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावे, जेणेकरून जर मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जीवितहानी होणार नाही, अशी सूचना करण्यात आली होती.

मुंबईत ठिकठिकाणी मॅनहोल्स असून, पर्जन्यजल वाहिन्या खाते, मलनि:सारण खाते, मलनि:सारण प्रचालने खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी यांसारख्या महापालिकेच्या विविध खात्यांच्या मॅनहोलचे जाळे मुंबईत पसरलेले आहेत.

या कामाअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिथे सर्वात जास्त पाणी भरते अशा ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या मोठ्या १४२५ मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्यात आल्या. तसंच, पावसाच्या दिवसांत ज्या ठिकाणचे मॅनहोल उघडावे लागते अशा ठिकाणीही जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यानंतर विभाग कार्यालयांना त्यांच्या परिसरात आढावा घेण्यास सांगण्यात आले. याअंतर्गत आणखी २००० ठिकाणी अशा जाळ्या बसवण्यात आल्या.



हेही वाचा -

महिला डब्यांत घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांवर करावाई

राजकारण सोडून लेखक व्हा; फडणवीसांना अजितदादांचा सल्ला



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा