Advertisement

राज्यात गुरुवारी २५ हजार ८३३ जणांना कोरोनाची लागण

गुरुवारी राज्यात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

राज्यात गुरुवारी २५ हजार ८३३ जणांना कोरोनाची लागण
SHARES

गुरुवारी राज्यात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच दिलासादायक बाब म्हणजे, १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं असून, यावर उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले. शिवाय, गेल्या ३- ४ दिवसांपासून बाधितांचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढत असून एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद गुरुवारी झाली.

सध्या राज्यात ८ लाख १३ हजार २११ व्यक्ती गृह अलगीकरणात असून, ७०९७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९०.७९ टक्क्यांवर गेलं आहे. देशात गेल्या एक दिवसात आणखी ३५ हजार ८७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, हा गेल्या १०० दिवसांमधील उच्चांक आहे. त्यामुळं बाधितांची संख्या १ कोटी, १४ लाख ७४ हजार ६०५ वर पोहोचली आहे.

२४ तासांतील रुग्णसंख्या 

  • नागपूर - ४५२३ 
  • मुंबईत - २८७७
  • पुण्यात - २७९१
  • औरंगाबादला - १२७४
  • पिंपरी-चिंचवड - १२७२



हेही वाचा -

राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा