पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या २६ लोकलचा १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक लोकलमध्ये २५ टक्के अतिरिक्त आसनक्षमता वाढणार आहे. सोमवार, २१ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत.
१० जलद मार्गावरील गाड्यांचादेखील विस्तार होणार आहे. सध्या १५ डब्यांच्या १०६ लोकल फेऱ्या होतात. सोमवारनंतर या फेऱ्यांची संख्या १३२ होणार आहे, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ होणार नाही. सध्या ७९ वातानुकूलित लोकल फेऱ्यांसह १,३८९ लोकल फेऱ्या रोज धावत आहेत. १५ डब्यांचा विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Twenty six additional services will be augmented from 12-car to 15-car service with effect from 21/11/2022. The total number of 15-car services will increase from 106 to 132. The list of augmented trains are as under pic.twitter.com/8ScuPUOufU
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) November 17, 2022
लोकल फेऱ्या रोज धावत आहेत. १५ डब्यांचा विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, चर्चगेट दिशेच्या अकराव्या द्वितीय श्रेणीच्या डब्यामध्ये विभाजन करण्यात आले आहे. या डब्यातील काही भाग महिला प्रवाशांसाठी २४ तास राखीव असणार आहे. पुरुष प्रवाशांनी या डब्यातून प्रवास केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संघटनांनी महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त महिला विशेष लोकल आणि अतिरिक्त महिला डबे जोडण्याची मागणी केली होती. या मागणीची वैधता तपासण्यासाठी पश्चिम रेल्वेवर महिला-पुरुष प्रवासी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात महिला प्रवाशांचा टक्का काही अंशांनी वाढल्याचे दिसून आले, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
कर्नाक उड्डाणपूल अखेर इतिहास जमा होणार आहे. अडीच महिन्यापासून या पुलाचे पाडकाम सुरू आहे. आज, शनिवारी रात्री ११ वाजता या कामाचा शेवटचा टप्पा अर्थात २७ तासांचा ब्लॉक सुरू होणार आहे. कर्नाक पुलाचे पाडकाम सुरू असताना सीएसएमटी ते भायखळादरम्यान शॅडो ब्लॉक घेण्यात येईल. यासाठी विविध विभागाचे एकूण एक हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. रेल्वे रूळ-स्लीपर्स बदलणे, मेल-एक्स्प्रेस फलाटांसंबंधी कामे करण्याचे नियोजन आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा