Advertisement

'२६ जुलैच्या महाप्रलयात मी थोडक्यात बचावलो'


'२६ जुलैच्या महाप्रलयात मी थोडक्यात बचावलो'
SHARES

26 जुलै 2005चा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. आज या घटनेला बारा वर्ष झाली. पण घडलेल्या घटनांनी मनात घर केले. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. 1 हजार 94 मुंबईकरांनी आपले प्राण गमावले. धावत्या मुंबईला जणू ब्रेकच लागला होता. 26 जुलैचा तो दिवस आठवला की अनेकांच्या अंगावर काटा येतो.मुंबईत राहणाऱ्या हबीब मिठी बोरवाला या २२ वर्षांच्या तरूणाच्या मनात 'हा' दिवस घर करून आहे. हबीब हा दुसरा तिसरा कुणी नसून 'रिमिक्स' या स्टार वन चॅनलवरील मालिकेत काम करणारा प्रसिद्ध कलाकार आहे. पण २६ जुलैच्या घटनेनंतर त्याचे आयुष्य बदलून गेलं. एक प्रकारे त्याचे करियरच संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते.  
साधारण चार वजता मी रोज मुव्हीजच्या ऑफिसमधून माझे टीडीएस सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडलो. मी माझ्या कारमधून घरी जायला निघालो. पण जुहू सर्कलला प्रचंड ट्रॅफिक होतं. त्यात कार काही जागेवरून पुढे जात नव्हती. पाऊस हळूहळू वाढत होता. मी माझ्या बाबांना कॉल केला. माझी काळजी करू नका. मी लवकरच घरी पोहोचेन, असे सांगितले. मी गाडीचा एसी सुरू केला. गाणी लावली. गाडीत पाणी येत होतं, म्हणून मी पाय वर करून बसलो. अचानक मी बेशुद्ध पडलो. पण त्यानंतर काय झाले? हे मला नीटसं आठवत नाही. डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. मला अर्धांगवायूचा झटका आला होता.
येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी एका दोघांनी मला गाडीत बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. 'हा मेला वाटतंय’, असे त्यांचे शब्द माझ्या कानावर येत होते. मी थोडाफार शुद्धीत होतो. पण माझे हात पाय हलत नव्हते. पण मी जिवंत असल्याचे पाहत त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले. मी पंधरा दिवस वेंटिलेटरवर होतो. डॉक्टरांनी तर माझ्या कुटुंबियांना सांगितले की, हबीबचे दोन्ही पाय कापावे लागतील. पण माझे नशीब खूप चांगले होते की तसे काही झाले नाही. मला असे वाटत होते की, आता माझे करियर संपले. मी कधीच चालू शकणार नाही.


चार वर्ष मी माझ्या गावी म्हणजे गेलो. गुजरातच्या गोध्रा  इथे मी फिजियोथेरीपिस्टकडून उपचार घेतले. हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. मी कधी चालू शकेन याची अपेक्षाच माझ्या कुटुंबियांनी सोडली होती. पण आज मी उड्या मारतोय, पोहू शकतोय. माझं आयुष्य आता रुळावर आलं आहे.    


२६ जुलैच्या महाप्रलयासाठी फक्त पालिकेला दोष देऊन चालणार नाही. कुठेतरी आपण सुद्धा याला जबाबदार आहोत. मुंबईकरांना महाप्रलयाचा सामना करावा लागला.  कारण आपणच हे नाले, गटारं घाण केली आहे. पालिका दरवर्षी नालेसफाई करते. पण माणूस पुन्हा या नाल्यांमध्ये कचरा, प्लॅस्टिक टाकतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग संपुष्टात येतात. यावर उपाय म्हणून मी सर्व कॉलेजमध्ये जाऊन जनजागृती करतो. माझी कहाणी तर त्यांना सांगतोच. शिवाय मुंबई स्वच्छ कशी ठेवता येईल याबद्दल जनजागृती करतो.  

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement