Advertisement

'खळ्ळ् खट्याक' करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना अटक


'खळ्ळ् खट्याक' करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना अटक
SHARES

सांताक्रूझ येथे फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेच्या अखिल चित्रे यांना सोमवारी वाकोला पोलिसांनी अटक केली. चित्रे यांच्यासह शाखा प्रमुख संदेश गायकवाड आणि २ मनसे कार्यकर्त्यांना दंगल आणि इतर कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या संताप मोर्चात फेरीवाल्यांना पुढच्या १५ दिवसांत हटवा, नाहीतर आमच्या स्टाईलने फेरीवाले हटवू, असा इशारा देऊनही फेरीवाल्यांना काही प्रशासनाने हटवलं नव्हतं. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मागच्या दोन दिवसांपासून मनसेने आपल्या स्टाईलने या फेरीवाल्यांना हटवण्यास सुरूवात केली आहे. मात्र फेरीवाल्यांविरोधात करण्यात आलेलं हे आंदोलन मनसे कार्यकर्त्यांच्या चांगलंच अंगलट येताना दिसत आहे.


कल्याण डोंबिवलीतही नेत्यांना अटक:

मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. यांत कल्याण प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे.

तर, डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या एकूण १२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, मनसे कार्यकर्ते स्वतःहून महात्मा फुले चौक आणि रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाले.


काय आहे प्रकरण?

१५ दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर रविवारी मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. दरम्यान दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २५ ते ३० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



हेही वाचा -

डबल स्ट्राईक, फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडात दुपटीने वाढ

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा