मुंबईतील 57 टक्के स्वच्छतागृह स्वच्छ

CST
मुंबईतील 57 टक्के स्वच्छतागृह स्वच्छ
मुंबईतील 57 टक्के स्वच्छतागृह स्वच्छ
See all
मुंबई  -  

मुंबईतील स्वच्छतागृहे अनेक खासगी कंत्राटदारांना पे अॅण्ड यूज तत्वावर पालिकेने दिले आहेत. मात्र या कंत्राटदारांनी स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे महापालिका अायुक्त अजोय मेहता यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यानंतर या स्वच्छतागृह कंत्राटदारांवर नजर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुंबईतील 54 स्वच्छतागृहांमध्ये फिडबॅॅक मशीन पालिकेतर्फे लावण्यात आले आहे. या फिडबॅक मशीनमध्ये गेल्या चार महिन्यात मुंबईकरांनी मुंबईतील केवळ 57 टक्के स्वच्छतागृहे स्वच्छ असल्याचे म्हटले आहे. 18 टक्के लोकांनी स्वच्छतागृह ठिक असल्याचे तर 25 टक्के लोकांनी स्वच्छतागृहात स्वच्छता नसल्याचे मत फिडबॅक मशीनमध्ये नोंदवले आहे.

[हे पण वाचा - पालिका कार्यालयातलीच स्वच्छतागृह अस्वच्छ!]

सर्वप्रथम ए विभागातील सीएसटी परिसरात असलेल्या भाटीया बाग स्वच्छतागृहात फीडबॅक मशीन लावण्यात आले होते. तेथे 74 टक्के मुंबईकरांनी स्वच्छता असून, 21 टक्के मुंबईकरांनी स्वच्छता ठिक असल्याचे तर 6 टक्के मुंबईकरांनी स्वच्छता नसल्याचे मत नोंदवले आहे.

[हे पण वाचा - अस्वच्छ शौचालयाबद्दल आयुक्तांकडून नोटिस]

स्वच्छतागृहातील कंत्राटदारांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने तब्बल प्रत्येकी 12 हजार रुपये एक मशीनमागे खर्च करून अशा 54 फिडबॅक मशीन मुंबईच्या तीनही मार्गावर 54 स्वच्छतागृहात लावली आहेत. मात्र स्वच्छतागृहात गेल्यावर अनेक नागरिकांना या मशीनबद्दल काही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. या स्वच्छता फीडबॅक मशीनचा महापालिकेकडून योग्य प्रसार आणि प्रचार झाला नसल्यामुळे मुंबईकर स्वच्छतागृहांबद्दल आपलं मत नोंदवू शकले नाहीत, त्यामुळेच मुंबईतील अनेक स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो.

काही महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांनी स्वच्छता फिडबॅक मशीनमध्ये नोंदवलेले मत खालीलप्रमाणे

गिरगाव चौपाटी शौचालय

85 टक्के नागरिकांनी स्वच्छता असल्याचे म्हटले असून, 10 टक्के नागरिकांनी स्वच्छता ठिक असून 5 टक्के नागरिकांनी स्वच्छता नसल्याचे म्हटले आहे.

दादर ब्रीज शौचालय

या शौचालयात 29 टक्के मुंबईकरांनी स्वच्छता असल्याचे म्हटले असून, 2 टक्के नागरिकांनी ठिक असल्याचे नमूद केले आहे, तर 69 टक्के नागरिकांनी या स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे.

[हे पण वाचा - परदेशी तरुणांनी मुंबईत महिलांसाठी बांधले शौचालय]

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.