Advertisement

१५ तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, मात्र आई निगेटिव्ह

पालघर जिल्ह्यातील नवजात बाळाला कोरोना झाल्याची ही पहिली घटना आहे.

१५ तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, मात्र आई निगेटिव्ह
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका १५ तासांपूर्वी जन्म झालेल्या बाळाला (New Born Baby Girl) कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तर तिच्या आईची चाचणी नकारात्मक (Negative) आली आहे.

वृत्तानुसार, दरशेत गावात राहणाऱ्या या महिलेला पालघर शहरातील खासगी नर्सिंग होममध्ये रविवारी दाखल केले. त्यानंतर तिनं मुलाला जन्म दिला.

प्रसूतीनंतर आई आणि मुलीची कोरोना चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी दोघींच्या चाचणीचा निकाल आला आणि सर्वांनाच धक्का बसला. कारण आईला कोरोनाचा संसर्ग नव्हता. पण बाळाला कोरोना झाल्याचं समोर आलं.

पालघर जिल्ह्यातील नवजात बाळाला कोरोना झाल्याची ही पहिली घटना आहे, असं वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या वृत्तानंतर लगेचच मुलीला जव्हार तालुक्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारपर्यंत, पालघर जिल्ह्यातील एकूण कोविड रुग्णांचा (corona patient)आकडा १ लाख ०९ हजार ८७४ च्या घऱात गेला आहे. तर २ हजार ०६६ रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू (Death rate) झाला.

दरम्यान, दुसर्‍या घटनेत महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यात मे महिन्यात ८ हजाराहून अधिक मुलांना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याव्यतिरिक्त, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Third wave) येऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. या लाटेचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे भितीचं आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

याशिवाय, कोरोनव्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराचे महाराष्ट्रात सोमवारी २४ तासांत १५ हजार ०७७ रुग्ण आढळले. ३ महिन्यातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. मृत्यूची टक्केवारीही दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे.

पण आता कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगस (Black Fungus) या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली आहे. वृत्तानुसार, मुंबईत म्युकमायकोसिसचे म्हणजेच ब्लॅक फंगसचे ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना अॅम्पोटेरेसिन हे इंजेक्शन दिले जाते. पण त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. 



हेही वाचा

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या २ डोसमधील कालावधी कमी करा, मनपाचं केंद्राला पत्र

मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, निर्बंध कडक करण्याचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा