Advertisement

तामिळनाडूचा 'बाहुबली गणेशा'!


तामिळनाडूचा 'बाहुबली गणेशा'!
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून बाहुबलीचे वादळच बॉक्स ऑफीसवर निर्माण झाले होते. त्यामुळे बाहुबलीला खांद्यावर उचलून घेणाऱ्या चाहत्यांमधील भक्तांना हेरून चक्क श्री गणेशाची मूर्तीच यंदा साकारली गेली आहे. मुख्य म्हणजे यंदा लालबागमधील सिद्धेश आर्ट्सच्या मंडपात 9 फुटांची बाहुबलीची गणेश मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती मुंबई किंवा महाराष्ट्रात नव्हे, तर चक्क तामिळनाडूमध्ये स्थापन केली जाणार आहे. सोमवारी हे बाहुबली श्री गणेशा तामिळनाडूला रवाना झाले असून सेलमचा राजा म्हणून बाहुबली श्री गणेशा विराजमान होणार आहेत.


9 फूट उंचीचा बाहुबली सिद्धेश आर्टच्या कलाशाळेत

मुंबईतील लालबाग येथील सिद्धेश आर्टच्या कलाशाळेत 9 फूट उंचीचा बाहुबली श्री गणेश मूर्ती साकारली आहे. तामिळनाडूतील सेलमचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाची ही मूर्ती आहे. मात्र, तामिळनाडूतील सेलमच्या राजा हा यंदा बाहुबलीच्या रुपात असून ही मूर्ती सोमवारी योग्यप्रकारे बंदिस्त करून सेलमच्या दिशेन रवाना झाली.


बाहुबलीच्या रुपातील तामिळनाडूतील एकमेव मूर्ती

ही बाहुबलीची गणेश मूर्ती तामिळनाडूतील सेलमला पाठवण्यात येणार असल्याचे सेलमचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी रणजित कुमार यांनी सांगितले. यापूर्वीही आम्ही मुंबईतूनच तामिळनाडूला मूर्ती घेऊन जात होतो. परंतु त्या 5 फुटांपर्यंतच्या असायच्या. या मूर्ती विलेपार्ले येथून नेल्या जात असत. पण यंदा प्रथमच लालबागमध्ये ही मूर्ती बुक केली असून ही मूर्ती 9 फूट उंचीची आहे. बाहुबलीची थीम आम्हाला प्रथम आवडली होती. बाहुबलीच्या रुपातील तामिळनाडूतील ही एकमेव मूर्ती असेल, असेही रणजित कुमार यांनी सांगितले.



हेही वाचा - 

'या' बाप्पांसाठी काढला 5 कोटींचा विमा!

गणपतीसाठी तयार होत आहेत खास 'इको फ्रेंडली' मखर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा