Advertisement

नाम जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या इमारतीचा भाग कोसळला

नाम जीशी मार्ग आणि नायगाव येथील इमारती अत्यंत जर्जर झाल्या आहेत. अशाच एका इमारतीचा भाग शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नाम जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या इमारतीचा भाग कोसळला
SHARES

नाम जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडानं सुरू केला आहे. नाम जोशी मार्ग आणि नायगावमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबीर तयार ठेवले आहेत. पण रहिवासी मात्र काही नं काही कारणाने संक्रमण शिबिरात जाण्यास नकार देत आहेत. हा नकार मात्र रहिवाशांसाठी जीवघेणा ठरणार नाही ना? अशी भीती आता निर्माण झाली आहे.


कारण नाम जीशी मार्ग आणि नायगाव येथील इमारती अत्यंत जर्जर झाल्या आहेत. अशाच एका इमारतीचा भाग शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


सुदैवाने जीवितहानी नाही

‌नाम जोशी मार्ग येथील इमारत क्रमांक 12 मधील तळमजल्यावरच्या स्लॅबचा भाग गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता कोसळला. पण सुदैवाने कुणाच्याही अंगावर स्लॅब कोसळला नाही. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. दरम्यान या इमारती 95 वर्षे जुन्या असून त्या दुरुस्ती पलिकडे गेल्या आहेत. तर आता या इमारतीच्या पुनर्विकासाची कामंही म्हाडाने हाती घेतलं आहे. मात्र अद्याप रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे रहिवासी जर्जर इमारतीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

तर असं झालं नसतं

नाम जोशी मार्ग येथील 400 हुन अधिक रहिवाशांची पात्रता निश्चिती झाली आहे. तर त्यांच्यासाठी 5 गिरण्यांच्या जागेवरील नव्या कोऱ्या टॉवरमधील संक्रमण शिबिरातील घर तयार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळानं रहिवाशांना या घरात स्थलांतरीत करण्याची सर्व तयारी केली आहे. पण रहिवासी जाण्यास तयार नसल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे हे रहिवासी नव्या घरात गेले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर रहिवाशांशी चर्चा करून त्यांना हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


त्याचाच फटका रहिवाशांना

बिडीडी चाळ पुनर्विकासावरून सध्या जोरात राजकारण सुरू असून त्याचाच फटका रहिवाशांना बसत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. याविषयी नाम जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समन्वय समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी मात्र आम्ही नव्या घरात जाण्यास तयार आहोत. पण म्हाडाकडूनच काही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं आहे. 

तर शुक्रवारची घटना लक्षात घेता म्हाडानं त्वरित रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्याची प्रक्रिया सुरू करवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर गणपती विसर्जनानंतर स्थलांतर करण्यास रहिवासी तयार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

पोलिसांसाठी २० हजार घरांची योजना - मुख्यमंत्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा