Advertisement

मुंबईतून ५०० सुरक्षाकवच भारतीय सैन्यांसाठी रवाना

चिनी सैन्याचा मुकाबला कार्यक्षमरित्या करण्यासाठी भारतीय सैन्यानं नवे सुरक्षाकवच धारण केले आहे.

मुंबईतून ५०० सुरक्षाकवच भारतीय सैन्यांसाठी रवाना
फोटो सौजन्य : इंडिया टुडे
SHARES

गलवान खोऱ्यात भारत-चीन (India-China Faceoff) सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवान (Indian Army) शहीद झाले आहेत. या चकमकीत चिनी सैन्यानं खिळे लावलेल्या रॉडचा वापर केला होता. चिनी सैन्य पूर्ण तयारीनिशी आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी चिनी सैन्याने क्रूर युद्धनीतीचा वापर करत मध्ययुगीन हत्यारांचा वापर केला, यामुळे भारतीय सैन्याचे अधिक नुकसान झाले.

पण मुंबईतून (Mumbai News) भारतीय सैन्यासाठी ५०० सुरक्षा कवचची डिलिव्हरी करण्यात आली आहेत. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारतीय सैनिकांच्या या सुरक्षा कवचमध्ये आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. हे कवच वजनानं हलके आणि मजबूत आहेत. हे कवच घातल्यास टोकदार वस्तू आणि दगडाच्या माऱ्यापासून सैनिकाचं संरक्षण होऊ शकतं. या कवचमुळे एलएसीवर चीनी सैनिकांनी हल्ला केल्यास जीवीतहानी होणार नाही.

गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्यानं नियमांचे उल्लंघन करुन मध्ययुगीन शस्त्रांचा वापर केला. यात भारतीय सैन्यदलातील २० जवान धारातीर्थि पडले. तर भारतीय सैन्यानं दिलेल्या प्रत्युतरात त्यांचे ३५ हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. या घटनेनंतर चिनी सैन्याचा मुकाबला कार्यक्षमरित्या करण्यासाठी भारतीय सैन्यानं नवे सुरक्षाकवच धारण केले आहे.


हेही वाचा

खाकीतील 'देव'माणूस, १४ दिवसाच्या बाळाला दिलं जीवनदान

चीनने गुप्तहेरास मदत केल्याचे उघड, हेरगिरीत आरोपीला आतापर्यंत ११ लाख रुपयांचा फायदा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा