Advertisement

इंधन दरवाढीनंतर कांदाही रडवणार! १० रुपयांनी झाला महाग

'एपीएमसी' मार्केटमध्ये घाऊक कांद्याचे दर प्रति किलो १७ ते २२ रुपये असून किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा ३० ते ३५ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात 'एपीएमसी' मार्केटमधील कांद्याचे दर १० ते १५ रूपये होते.

इंधन दरवाढीनंतर कांदाही रडवणार! १० रुपयांनी झाला महाग
SHARES

इंधन दरवाढ, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं आधीच मोडलेलं असताना त्यात आता कांद्याचीही भर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्यासह इतर पिकालाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसातं काद्यांचे भावही गगनाला भिडणार असून दरवर्षीप्रमाणं यंदाही कांदा रडवणार आहे.


आवक घटली

यंदा कांद्याचं उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठांमध्ये होणारी कांद्याची आवाक घटली आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी साठवण करून ठेवलेला कांदाही काही दिवसांनी संपणार आहे. सध्या नवी मुंबईतील 'एपीएमसी' मार्केटमधील कांद्यांच्या गाड्यांची आवक ४० ते ६० गाड्यांवर आली आहे. या कारणामुळं मुंबई, ठाणे यांसह इतर ठिकाणी कांदाचे दर ३० रूपयांनी वाढले आहेत.


किती रुपयांनी महाग?

'एपीएमसी' मार्केटमध्ये घाऊक कांद्याचे दर प्रति किलो १७ ते २२ रुपये असून किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा ३० ते ३५ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात 'एपीएमसी' मार्केटमधील कांद्याचे दर १० ते १५ रूपये होते. त्याकडे पाहता आठवड्याभरात कांद्याच्या किंमती जवळपास १० रुपयांनी वाढल्याचं दिसत आहे.



हेही वाचा-

मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपयांवर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा