अमित शाहांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण


SHARE

भ्रष्टाचाराचा आरोप झाला की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजीनामे देतात, हा इतिहास आहे. आधी जैन हवाला केसमध्ये लालकृष्ण अडवाणी, तहलका प्रकरणात बंगारू लक्ष्मण आणि स्फूर्ती प्रकरणात नितीन गडकरी यांनी राजीनामा दिला होता. हा इतिहास लक्षात घेऊनच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शाह यांनी आता त्यांच्या विरोधात होणाऱ्या आरोपामुळे राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.


'टेम्पल एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लि.' याला एवढा फायदा कसा -

अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह आणि त्याच्या मित्राने 2004 मध्ये 'टेम्पल एंटरप्रायझेस लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली होती. या कंपनीने 2004 ते 14 पर्यंत कोणतेही काम केले नाही. मात्र सरकार येताच 14-15 ला या कंपनीची उलाढाल सुरू झाली. 2017 ला कंपनीची उलाढाल 80 कोटी 50 लाख झाली. म्हणजे या कंपनीला 16 हजार पटींनी फायदा झाला, असे सांगत यामध्ये काही तरी गडबड असल्याची टीका चव्हाण यांनी केली.


नोटांबंदीचा भूकंप शाह यांच्या मुलाला माहीत होता का?

ऑक्टोबर 2016 मध्ये टेम्पल एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी बंद करण्यात आली. त्यानंतर नोटा बंदी झाली, म्हणजे कुठे तरी नोटाबंदीनंतर बोगस कंपन्या बंद होणार या आधीच या कंपनीला माहीत होते का? असा प्रश्न चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.


याची सखोल चौकशी व्हावी -

सरकार बदलल्याबरोबर जय शाह यांच्या कंपनीचे भाग्य उजळळे. या कंपनीला एक कर्ज रिलायन्स, दुसरे निरमा कंपनीच्या संबंधित असलेल्या कंपनीने आणि तिसरे भारत सरकारने कर्ज दिले. याची चौकशी ईडी आणि सीबीआयने केली पाहिजे, असे सांगत पियुष गोयल यांच्यावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. भ्रष्टाचार मुक्त प्रशानाचा नारा देणाऱ्या मोदींनी यामध्ये लक्ष घालावे, असे देखील चव्हाण यावेळी सांगायला विसरले नाहीत.


हेही वाचा - 

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर लढावंच लागेल - अमित शाह

नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचं टीकास्त्र


संबंधित विषय