Advertisement

मुंबईचा डबेवाला लवकरच सुरू करणार सेंट्रल किचन, 'अशी' आहे योजना

लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एक वेगळे आणि नवीन साधन म्हणून लवकरच सेंट्रल किचनची सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबईचा डबेवाला लवकरच सुरू करणार सेंट्रल किचन, 'अशी' आहे योजना
SHARES

कोरोनाच्या महामारीनं डबेवाल्यांची आर्थिक गणितं चुकली आहेत. त्यामुळे आता डबेवाले आधुनिकतेकडे कूच करत आहेत. मागील एक वर्षापासून डबेवाल्यांच्या कार्यप्रणालीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यांची १३० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एक वेगळे आणि नवीन साधन म्हणून लवकरच 'सेंट्रल किचन'ची सुरुवात करण्यात येणार आहे. या किचनच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न करण्याकडे जास्त लक्ष देण्यात येणार आहे.

किचनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी कमी किंमतीत योग्य आणि पूरक आहार देण्याचा त्यांचा मानस आहे. या किचनच्या माध्यमातून जवळपास २०० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय भविष्यात ही सेवा अनेक शहरांमध्ये सुरू केली जाऊ शकते.

साकी नाका इथल्या एक हजार चौरस फूट “क्लाऊड किचन” मध्ये ७ दिवसांच्या मेनूची सोय केली जाईल. २५ वर्षीय डबावाला रितेश आंद्रे म्हणाले की, काही डबावाला आणि त्यांचे साथीदार F &B तज्ञाकडून प्रशिक्षण घेत आहेत आणि ही सेवा २५ जूनपर्यंत सुरू करण्याची त्यांची योजना आहे.

“आम्ही एक वेबसाइट तयार करत आहोत जिथे लोक थेट त्यांच्या ऑर्डर देऊ शकतात. एक मासिक किंवा वार्षिक वर्गणीदर निवडू शकतो. ऑनलाइन पैसे हस्तांतरण देखील करीत आहोत. डबा सर्व्हिस नेहमी रोख व्यवहारावर अवलंबून असतात, ”असं आंद्रे पुढे म्हणाले.

डबेवाले यमनाजी घुले म्हणाले, “आम्ही सर्वात वाईट परिस्थितींतून काम केलं आहे. पाऊस, पूर, दहशतवादी हल्ले, पण यापूर्वी कधी आमची सेवा थांबली नाही. माझी सात डब्बावालांची टीम माहीम-वरळी-सायन दरम्यान दिवसाला २० डबे पोहचवायचो. पण आता हा आकडा ४च्या घरात आहे.”

“मी जानेवारीत पुन्हा सेवा सुरू झाल्यावर मुंबईला आलो. पण मुंबईत आता पुन्हा लॉकडाऊन लागला. मी ४० वर्षांहून अधिक काळ हे करत आहे, हे मला माहित असलेलं एकमेव काम आहे, ”ते पुढे म्हणाले. 

नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास शांताराम मुके म्हणाले, “गेल्या जूनमध्ये कार्यालयं सुरू झाली तेव्हा आम्ही आमच्या सेवा पुन्हा सुरू करण्यास सक्षम होतो. तेव्हा ३०० ते ४०० डबे पाठवले जायचे. पण आता केवळ १०० ते १५० डबे पाठवतो."

दहिसरपासून चर्चगेट, घाटकोपर आणि सीएसएमटीसारख्या भागात ही सेवा पुरवली जाईल. दोन आणि चार कप्प्यांच्या डब्यामध्ये जेवण वितरित केलं जाईल. नियमित जेवण आणि मिनी-जेवण यामध्ये ग्राहकांना पर्याय असेल. नियमित जेवणात दोन रोट्या, दोन सबझी, तांदूळ, डाळ, लोणचे, पापड आणि कोशिंबीर देण्यात येतील, तर मिनी-जेवणामध्ये अनुक्रमे दोन रोट्या आणि दोन सब्जी देण्यात येतील.

कोबिड -१९ आयसोलेशन सेंटर, होम क्वारेन्टाईन तसंच शहरातील रूग्णालयांमधील आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या स्वरूपात डबाबालांनी नवीन ग्राहक तळ शोधला आहे. सेंट्रल किचनद्वारे आता डबेवाला स्वत: बनवलेलं जेवण ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतील.हेही वाचा

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मुंबईचा डबेवाला होणार 'पार्सल बॉय'

मुंबई डबेवाला असोसिएशन डबेवाल्यांच्या मदतीला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा