'वर्षा'च्या पत्त्यावर मिळालं चक्क लेडिज बारचं लायसन्स!

वर्षा बंगला आणि महापालिका मुख्यालय ही दोन ठिकाणं म्हणजे राज्यातील सर्वात हायप्रोफाइल वास्तू. एका ठिकाणी राज्याचा कारभार हाकणारी व्यक्ती राहते, तर दुसऱ्या ठिकाणाहून मुंबई महानगराला पायाभूत सोई सुविधा पुरवल्या जातात. असं असूनही या दोन्ही वास्तूच्या नावे चक्क लेडिज बार आणि हुक्का पार्लरचे परवाने मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे.

SHARE

वर्षा बंगला आणि महापालिका मुख्यालय ही दोन ठिकाणं म्हणजे राज्यातील सर्वात हायप्रोफाइल वास्तू. एका ठिकाणी राज्याचा कारभार हाकणारी व्यक्ती राहते, तर दुसऱ्या ठिकाणाहून मुंबई महानगराला पायाभूत सोई सुविधा पुरवल्या जातात. असं असूनही या दोन्ही वास्तूच्या नावे चक्क लेडिज बार आणि हुक्का पार्लरचे परवाने मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीच्या नावे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.


कारभारावर टिका

'इज आॅफ डुईंग बिझनेत' अंतर्गत संबंधित व्यक्तीने हा परवाना महापालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागातून मिळवला आहे. महापालिकेच्या डी विभागाकडून हा परवाना देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. परंतु पडताळणीविना आॅनलाइन परवाना दिल्याने प्रशासनाच्या कारभारावर टिका होऊ लागली आहे.


'हा' आहे पत्ता

मुख्यमंत्र्यांच्या ‘लेडीज बार अँड रेस्टॉरंट’साठी ०२, ०२, वर्षा, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, मुंबई- ४०००२६, तर आयुक्तांच्या ‘हुक्का पार्लर’साठी ‘हुक्का पार्लर’करीता महापालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, मुंबई ४००००१ हा पत्ता देण्यात आला आहे. २४ आॅगस्ट २०१८ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीसाठी ही नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.


नियमांतर्गत कारवाई

महापालिकेने बांधकाम परवानगीपासून, गुमास्ता परवाना, आस्थापनांच्या नोंदणीपर्यंत विविध सुविधा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला स्व घोषित माहितीच्या आधारे परवाना देण्यात येतो. परंतु ही प्रक्रिया सदोष असल्याचं दिसून येत आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास नियमांतर्गत त्या व्यक्तीवर कारवाई करता येते. त्यानुसार आता महापालिका लायसन्स मिळवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

या आधी याच पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये बकरी ईदच्या वेळेस बकरा कापण्याचं लायसन्स देण्यात आलं होतं. यावरून बराच गदारोळ झाला होता.हेही वाचा-

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

आयकर विभागानं ५५ कोटींना विकल्या नीरव मोदीच्या पेंटिंग्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या