Advertisement

भीमा कोरेगाव हिंसाचार: १३४ एसटी, तर २० बेस्ट बसचे नुकसान


भीमा कोरेगाव हिंसाचार: १३४ एसटी, तर २० बेस्ट बसचे नुकसान
SHARES

भीमा-कोरेगाव हिंचासाराचे मुंबईत तीव्र पडसाद उमटत असून एसटी सेवा आणि बेस्ट सेवेलाही त्याचा फटका बसत आहे. एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईसह राज्यभरातील १३४ एसटी गाड्यांचं या हिंसाचारात नुकसान झालं आहे. तर २० बेस्ट बसगाड्या फोडण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



कुठे, किती नुकसान?

कोणत्याही हिंसाचारात वा दंगलीत रेल्वे, एसटी आणि बेस्ट बस साॅफ्ट टार्गेट असतात. त्यानुसार मंगळवारीही मुंबईत ठिकठिकाणी रेल्वे, एसटी आणि बेस्ट बस रोखून त्यांना फोडण्यात आलं. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १३४ एसटी गाड्यांचे नुकसान झालं आहे. औरंगाबाद येथे २१, बीड ६, जालना ७, लातूर ६, नांदेड २, उस्मानाबाद ६, परभणी १७, मुंबई ४, ठाणे १, पुणे ६, कोल्हापूर ४, सांगली ५, सातारा २, सोलापूर ४, नाशिक ४, धुळे, जळगाव ४, अहमदनगर ११, अकोला ६, यवतमाळ१ आणि बुलढाणा ९ अशा १३४ एसटी गाड्यांचे नुकसान झालं आहेत.



बेस्ट गाड्याही फोडल्या

तर, कुंभारवाड्यात ३५७/५ क्रमांकाची, साईधाम येथे ३०७ क्रमांकाची, वढवली, चेंबूर २१ लिमिटेड-बी, चेंबूर कॅम्प येथे २१ एसआर-५, चेंबूर नाका येथे ३८२ लिमीटेड-१४, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे ३०७-५, चेंबूर नाका येथे ५२१ लिमिटेड १५, आरसीएफ काॅलनी यथे ३५१-०३, चेंबूर नाका येथे ३८१-१२, कुर्ला सिग्नल येथे २७-०२, अमर महल जंक्शन येथे २७-०६, पीएनटी साईधाम येथे ४०३-०३, अमर महल येथे ३८२ लिमिटेड-१४, अमरमहल येथे ३८०-७, देवनार फायर स्टेशन३५७-१०, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे ५१२ लिमिटेड-३, गोल्फ क्लब येथे ३६४-०१, कुर्ला एसटी डेपो येथे ३५५ लिमिटेड-७, चेंबूर वडवली येथे ५०२ लिमिटेड-२, चेंबूर काॅलनी येथे ३७३ लिमिटेड १०, कुंभारवाडा येथे ५०५ लिमिटेड-५ आणि मुलुंड येथे १४०९ अशा २० बेस्ट गाड्यांचं नुकसान मंगळवारी मुंबईत झालं आहे.


एसटी बसेस तुमच्याच आहेत. कृपया त्यांची मोडतोड करून सर्वसामान्य माणसांच्या
दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका. एसटीला वेळोवेळी आंदोलकांकडून 'लक्ष्य' केले जाते. त्यामुळे दररोज एसटीवर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. एसटीचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्याहीपेक्षा प्रवाशांना अधिक त्रास होतो. म्हणूनच कृपया आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक, रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करून त्याची मोडतोड करू नये.
- दिवाकर रावते, परिवहन व एसटी महामंडळाचे अध्यक्ष



हेही वाचा-

भीमा कोरेगाव हिंसाचार: संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे विरोधात गुन्हा दाखल

भीमा कोरेगाव हिंसाचार: रेलरोकोमुळे हार्बर मार्ग विस्कळीत 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा