Advertisement

४ आठवड्यात कोरोनाचा दुसरा डोस द्यावा, केरळ हाईकोर्टाचा केंद्राला आदेश

कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस ४आठवड्यांनंतर उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. आता केंद्र यावर काय निर्णय घेते?

४ आठवड्यात कोरोनाचा दुसरा डोस द्यावा, केरळ हाईकोर्टाचा  केंद्राला आदेश
SHARES

कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield vaccine) दुसरा डोस (Second dose) ४आठवड्यांनंतर (४ weeks) इच्छा असेल, त्यांना तो उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश केरळ उच्च न्यायालयानं (Kerala high court) केंद्र सरकारला (Central government) दिले आहेत.

सध्या कोव्हिशिल्डच्या पहिल्या लसीनंतर किमान ८४ दिवसांनी दुसरी लस घेण्याची परवानगी दिली जाते. मात्र ज्या नागरिकांना ४ आठवड्यानंतर ही लस घ्यायची असेल, त्यांना ती लगेच उपलब्ध व्हावी, असे आदेश कोर्टानं दिले आहेत.

ज्या नागरिकांना परदेशी जायचे असते, त्यांना ४ आठवड्यानंतर कोव्हिशिल्डची लस घेण्याची परवानगी सरकारकडून दिली जाते. मात्र ज्या नागरिकांना आरोग्याच्या कारणासाठी ४ आठवड्यांनी लस घेण्याची इच्छा आहे, त्यांना मात्र ही परवानगी दिली जात नाही. हा दुजाभाव योग्य नसून सर्वांना समान अधिकार असणं गरजेचं असल्याचं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

न्या. पी. बी. सुरेश कुमार यांनी दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारनं सर्व नागरिकांसाठी समान तरतुदी करणं गरजेचं आहे. पहिल्या डोसनंतर ४ आठवडे झाल्यास कुठल्याही वेळी लसीची नोंदणी करण्याची वेळ CoWin app वर करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

केरळमधील क्लाइटेक्स गारमेंट्स या कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिले आहेत. या कंपनीनं आपल्या ५००० कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस दिला आहे. दुसरा डोस देण्याची तयारी केली आहे. मात्र ८४ दिवसांच्या मर्यादेमुळे पैसे भरूनही कर्मचाऱ्यांना लस मिळत नसल्याची तक्रार कंपनीनं केली आहे.

परदेशी जाणाऱ्या नागरिकांना लस मिळते, तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ती का उपलब्ध होत नाही, असा सवाल करत या कंपनीने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिला आहे.



हेही वाचा

कोरोनाची 'ही' नवीन लक्षणं जास्त धोकादायक, वेळेवर चाचणी करणं ठरेल योग्य

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या ५ शहरांच्या यादीत मुंबई, ठाण्याचंही नाव

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा