Advertisement

कोरोनाची 'ही' नवीन लक्षणं जास्त धोकादायक, वेळेवर चाचणी करणं ठरेल योग्य

कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोरोनाची 'ही' नवीन लक्षणं जास्त धोकादायक, वेळेवर चाचणी करणं ठरेल योग्य
SHARES

कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये डोळे लाल होणे, तोंडात कोरडेपणा जाणवणे, ऐकू कमी येणे, डोकेदुखी या नव्या लक्षणाचा समावेश आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे. खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी कोरोनाची सामान्य लक्षणं रुग्णांमध्ये सापडली नाहीत. पण काही नवीन लक्षणं तपासणी केल्यानंतर समोर आली.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी काही विकसनशील लक्षणांची यादी केली ज्यात डोळ्यांना होणारा दाह, तीव्र अशक्तपणा, ऐकण्यात समस्या, कोरडे तोंड आणि कमी लाळ निर्माण होणं, सतत डोकेदुखी आणि त्वचेवर पुरळ हे कोविड -19 चे संकेत असू शकतात.

रविवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्ट केलं की व्हायरस सुमारे १७ महिन्यांपासून आहे, नवीन लक्षणं सतत विकसित होत आहेत ज्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी सांगितलं की, डेल्टा व्हेरिएंटमध्ये अनेक वेगळी लक्षणं दिसली आहेत. ज्यात अतिसार, उलट्या आणि मळमळ होते. वेगवेगळ्या स्वरूपात, ताप कायम असू शकतो, काहींना ताप येत नाही. काहींना तो क्षणात येतो. काही अंतरानं, तर काहींमध्ये तो तीव्रतेनं येऊन परत जातो, असं ते म्हणाले.

टास्क फोर्सच्या सदस्यांनी सांगितलं की, यावर एकच उपाय म्हणजे लवकर चाचणी करणं. डॉ ओक यांनी सांगितलं की, कोविड चाचणी म्हणजेच आरटी-पीसीआरला प्रोत्साहित करण्यात कौटुंबिक डॉक्टरांची महत्वाची भूमिका आहे. ते म्हणाले की, जर चाचण्या तातडीनं केल्या गेल्या तर रुग्णाला अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिली जाऊ शकतात जे लवकर दिल्यास कार्यक्षम असतात.

परिषदेत, एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी स्पष्ट केलं की, ज्यांनी सकारात्मक चाचणी केली त्यांनी त्यांचे तापमान, नाडी, रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी आणि रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.

तज्ज्ञांनी यावर भर दिला की, पूर्ण बरे होण्यास सुमारे तीन आठवडे लागू शकतात. हृदयरोगतज्ज्ञ डॉ अजित देसाई यांनी सांगितलं की, कोविड -19 नंतर, जवळजवळ ४०% रुग्ण चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरसह लढू शकतात, तर काही ५% थ्रोम्बोइम्बोलिक इव्हेंट्स असू शकतात.



हेही वाचा

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या ५ शहरांच्या यादीत मुंबई, ठाण्याचंही नाव

लसीकरणात मुंबई अव्वल, १ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा